• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup : मुंबईच्या 'या' खेळाडूवर असेल या वर्ल्ड कपमध्ये मोठी जबाबदारी, सचिनचं भाकित VIDEO

T20 World Cup : मुंबईच्या 'या' खेळाडूवर असेल या वर्ल्ड कपमध्ये मोठी जबाबदारी, सचिनचं भाकित VIDEO

मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धा संपलीय. पण या टीममधील 6 खेळाडूंची मोठी परीक्षा आगामी काळात होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर लगेच टी20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार असून त्यासाठी टीम इंडियामध्ये या सर्वांची निवड झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 10 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) आव्हान संपुष्टात आलं आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईला यंदा 'प्ले ऑफ' (IPL Playoffs) गाठण्यात अपयश आलं. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल स्पर्धा आता संपलीय. पण या टीममधील 6 खेळाडूंची मोठी परीक्षा आगामी काळात होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर लगेच टी20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार असून त्यासाठी टीम इंडियामध्ये या सर्वांची निवड झाली आहे. महान क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा टी20 वर्ल्ड कपसाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू असल्याचं म्हंटलं आहे. सचिननं आगामी वर्ल्ड कपपूर्वी सूर्याला एक खास मेसेज दिला आहे. सूर्यकुमार यादवनं सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये 82 रनची आक्रमक खेळी केली होती. या खेळीनंतर मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमारला ड्रेसिंग रुमचा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरव केला. सचिनही यावेळी उपस्थित होता. मुंबईनं या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिननं सूर्याचं आक्रमक खेळीबद्दल अभिनंदन केलं तसंच आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा दिल्या. सचिन यावेळी त्याला म्हणाला की, आगमी काळात तुझी भूमिका आणखी महत्त्वाची असेल. सचिनचा इशारा आगामी टी20 वर्ल्ड कपकडे होता. या वर्ल्ड कपमध्ये सूर्या टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमध्ये खेळू शकतो. आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये सूर्यकुमार यादवची सुरुवात निराशाजनक झाली होती. त्यानं पहिल्या 4 मॅचमध्ये फक्त 16 रन काढले होते. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्याला फॉर्म गवसला. हैदराबाद विरुद्ध तर त्यानं फक्त 40 बॉलमध्ये 82 रन काढले. या खेळीत त्यानं 13 फोर आणि 3 सिक्स लगावले. T20 World Cup: टीम इंडियात बदल होणार का? BCCI कडून आले मोठे अपडेट सूर्यकुमारसह इशान किशननं (Ishan Kishan) हैदराबाद विरुद्ध  32 बॉलमध्ये 11 फोर आणि 4 सिक्ससह 84 रनची खेळी केली. हे दोघंही फॉर्मात आल्यानं टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: