मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 स्थगित होताच अँकर झाली निवांत, नवऱ्याला लावलं कामाला...

IPL 2021 स्थगित होताच अँकर झाली निवांत, नवऱ्याला लावलं कामाला...

आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अचानक स्थगित झाली. या निर्णयामुळे जरा निवांत झालेल्या स्पोर्ट्स अँकर (Sports Anchor) प्रिती दहिया (Preeti Dahiya) यांनी आयपीएल स्थगित झाल्यानंतर नवऱ्यासोबचा एक मजेदार फोटो ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 7 मे: एप्रिल आणि मे महिन्याच्या उन्हाळ्यात चालणारी आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अचानक रद्द झाली. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा (Covid-19) उद्रेक झाला. चार खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे बीसीसीआयला ही स्पर्धा स्थगित करावी लागली. ही स्पर्धा स्थगित होताच सर्व खेळाडू आता घरी परतत आहेत.

आयपीएल स्पर्धा कव्हर करणारे पत्रकार आणि अँकर यांचंही या काळात खेळाडूंप्रमाणेच व्यस्त वेळापत्रक असतं. रोज होणारे सामने कव्हर करताना त्यांची दमछाक होते. कधी-कधी एकाच दिवसामध्ये दोन मॅच देखील कव्हर कराव्या लागतात. या सर्वांनाही आयपीएल अचानक स्थगित झाल्यानं जरा निवांतपणा मिळाला आहे.

स्पोर्ट्स अँकर (Sports Anchor) प्रिती दहिया (Preeti Dahiya) यांनी आयपीएल स्थगित झाल्यानंतर नवऱ्यासोबचा एक मजेदार फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रिती यांचे पती सीजी अय्यप्पा (CG Aiyappa) हे प्रिती यांच्या केसाला तेल लावत आहेत  'आयपीएल रद्द झाली, बायकोची सेवा कर' असं कॅप्शन प्रिती यांनी या फोटोला दिलं असून तो फोटो सध्या चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.

धवननं घेतली लस

टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) यानं बदललेल्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम केलं आहे. धवननं कोरोना लशीचा (corona vaccine) पहिला डोस घेतला आहे. कोरोना लस घेणारा धवन हा टीम इंडियाचा (Team India) पहिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी लस घेतली आहे.

टीम इंडियाची आज निवड, 'या' मुंबईकरला मिळणार पुन्हा संधी

धवननं लस घेतल्यानंतर एक ट्विट केलं आहे. "व्हॅक्सिन घेतलं. त्याग, समर्पणासाठी सर्व कोरोनो योद्ध्यांचे आभार. कृपया लाजू नका, लवकरात लवकर लस घ्या. याच माध्यमातून आपण या व्हायरसला हरवू शकतो." असं आवाहन धवननं केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2021, Photo viral