• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: ऋतुराजच्या खेळीनंतर सूर्यानं केलं असं काही... चाहत्यांची जिंकली मनं! पाहा PHOTO

IPL 2021: ऋतुराजच्या खेळीनंतर सूर्यानं केलं असं काही... चाहत्यांची जिंकली मनं! पाहा PHOTO

चेन्नईचा ओपनिंग बॅट्समन ऋतुराज गायकवाडनं (Rituraj Gaikwad) मुंबई विरुद्ध दमदार अर्धशतक करत सर्वांना प्रभावित केलं. त्याची ही खेळी संपल्यानंतर सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) केलेल्या कृतीनं सर्वांचं मन जिंकलं.

 • Share this:
  दुबई, 20 सप्टेंबर : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सिझनच्या (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला यूएईमध्ये सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात झाली. यामध्ये चेन्नईनं (CSK) मुंबईचा (MI) 20 रननं पराभव केला. या मॅचमध्ये चेन्नईचा ओपनिंग बॅट्समन ऋतुराज गायकवाडनं (Rituraj Gaikwad) या मॅचमध्ये दमदार अर्धशतक करत सर्वांना प्रभावित केलं. त्याची ही खेळी संपल्यानंतर सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) केलेल्या कृतीनं सर्वांचं मन जिंकलं. रविवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेतली. चेन्नईची सुरुवात खराब झाली. 6ओव्हरनंतर त्यांची अवस्था 4 आऊट 24 होती. त्यावेळी ऋतुराजरनं दमदार खेळी करत चेन्नईला सावरलं. त्यानं 58 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 9 फोरच्या मदतीनं नाबाद 88 रन काढले. हा ऋतुराजचा आयपीएल कारकिर्दीमधील सर्वोच्च स्कोअर आहे. त्याच्या या खेळीमुळेच चेन्नईला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 156 रन करता आले. ORANGE CAP: ऋतुराज गायकवाडनं चेन्नईच्या इनिंगमधील शेवटच्या बॉलवर बुमराहला सिक्स लगावला. तो इनिंग संपल्यानंतर परत येत असताना सूर्यकुमारनं त्याच्याशी हस्तांदोलन केलं. तसंच त्याच्या डोक्यावर हाथ ठेवून चांगल्या खेळीबद्दल त्याची पाठ थोपटली. सूर्या आणि ऋतुराजचा हा फोटो चेन्नई सुपर किंग्सनं त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. सूर्यकुमारच्या या खिलाडू वृत्तीची क्रिकेट फॅन्स प्रशंसा करत आहेत. IPL 2021: पोलार्डची एक चूक ठरली मुंबईला भारी, धोनीला मिळालं विजयाचं गिफ्ट चेन्नई टॉपवर मुंबईविरुद्धच्या या विजयासोबतच चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. 8 पैकी 6 सामन्यांमध्ये चेन्नईचा विजय झाला तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे मुंबईची टीम चौथ्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईने 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.
  Published by:News18 Desk
  First published: