• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: काय आहे रोहित शर्माचं 'top secret'? सूर्यकुमार यादवनं केला खुलासा

IPL 2021: काय आहे रोहित शर्माचं 'top secret'? सूर्यकुमार यादवनं केला खुलासा

आयपीएल स्पर्धा (IPL 2021) सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या टीममधील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) रोहित शर्माचं (Rohit Sharma) एक खास सिक्रेट सर्वांशी शेअर केलं आहे.

 • Share this:
  चेन्नई, 9 एप्रिल: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. रोहितच्या कॅप्टनसीमध्ये मुंबईनं 5 वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. रोहितची टीम यंदा सहाव्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएल स्पर्धा (IPL 2021) सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या टीममधील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) रोहित शर्माचं  एक खास सिक्रेट सर्वांशी शेअर केलं आहे. सूर्यकुमार यादवनं 'स्पोर्ट्स टुडे' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्माचं स्वभाव वैशिष्ट्य सांगितलं आहे. रोहितला कोणती गोष्ट अन्य कॅप्टनपेक्षा वेगळी बनवते याचं रहस्य सूर्यकुमारनं या मुलाखतीमध्ये जगाशी शेअर केलं आहे. सूर्यकुमार यादवनं या मुलाखतीमध्ये सांगितलं की, "रोहितनं कमाल काम केलं आहे. त्याचा रिझल्ट सर्वांच्या समोर आहे. मुंबई इंडियन्सनं 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. रोहित मैदानात दिसतो त्याच्या अगदी उलट तो मैदानाच्या बाहेर असतो. मैदानात संपूर्ण परिस्थिती त्याच्या नियंत्रणात असते. मैदानाच्या बाहेर तो अधिक परफेक्ट आहे, असं मला वाटतं. त्याचा स्वभाव मजेशीर आहे. त्याला थट्टा मस्करी आवडते. त्यामुळे तो त्याच्या सहकाऱ्यांशी लवकर कनेक्ट होतो. रोहित शर्मामधील ही मोठी गोष्ट त्याला अन्य सर्वांपेक्षा वेगळी बनवते," असं सूर्यानं या मुलाखतीमध्ये सांगितलं. आरसीबीशी पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) या लढतीनं आयपीएलचा चौदावा सिझन सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्सची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर नेहमी वरचढ ठरली आहे. गेल्या 10 पैकी 8 मॅचमध्ये रोहित शर्माची टीम विजयी झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला फक्त 2 मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. यापैकी एक मॅच आरसीबीनं सुपर ओव्हरमध्ये जिंकली आहे. ( IPL 2021, MI vs RCB: ही आहे दोन्ही टीमची संभाव्य Playing XI ) मुंबई इंडियन्सनं गेल्या आठ सिझनमध्ये पहिली मॅच गमावली आहे. ही आरसीबीसाठी दिलासादायक गोष्ट आहे. मुंबईच्या टीमला यंदा हा नकोसा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
  Published by:News18 Desk
  First published: