Home /News /sport /

IPL 2021, SRH vs PBKS: पंजाबनं टॉस जिंकला, दोन्ही टीममध्ये 3 बदल

IPL 2021, SRH vs PBKS: पंजाबनं टॉस जिंकला, दोन्ही टीममध्ये 3 बदल

या आयपीएलमध्ये (IPL 2021) पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी असलेल्या पंजाब किंग्ज (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात मॅच होत आहे. या मॅचमध्ये दोन्ही टीममध्ये तीन बदल करण्यात आले आहेत.

    चेन्नई, 21 एप्रिल: या आयपीएलमध्ये (IPL 2021) पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी असलेल्या पंजाब किंग्ज (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात मॅच होत आहे. हैदराबादनं या स्पर्धेत सलग तीन मॅच हरल्या आहेत. तर पंजाबनं पहिली मॅच जिंकल्यानंतर नंतरच्या दोन मॅचमध्ये पराभव पत्कारला आहे. सध्या पॉईंट टेबलमध्ये पंजाबची टीम सातव्या तर हैदराबादची टीम आठव्या क्रमांकावर आहे. या मॅचमध्ये पंजाबचा कॅप्टन केएल राहु याने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये फेबियन एलन आणि मोईसेस हेन्रीस या दोन खेळाडूंचा पंजाबनं समावेश केला आहे. हे दोघंही पंजाबकडून पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहेत. तर हैदराबाच्या टीममध्ये अनुभनी केन विल्यमसनचा समावेश करण्यात आला आहे. तसंच केदार जाधव ऑरेंज आर्मीकडून खेळताना दिसेल. या मॅचमध्ये दोन्ही टीममध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. या आयपीएलमध्ये पंजाबची टीम पहिल्यांदाच चेन्नईत खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पंजाबच्या बॉलर्सनं निराशा केली होती. तर हैदराबादला सलग तीन मॅचमध्ये मिडल ऑर्डरच्या बॅट्समननी दगा दिल्यानं पराभव सहन करावा लागला आहे. दोन्ही टीम पॉईंट टेबलमध्ये तळाशी असल्या तरी त्यांच्याकडं अनेक मॅचविनर्स आहेत. हैदराबादच्या टीममध्ये डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो हे आक्रमक बॅट्समन असून भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान हे अनुभवी बॉलर्स देखील आहेत. पंजाबच्या टीमची टॉप ऑर्डर चांगलीच मजबूत आहे. कॅप्टन केएल राहुलसह, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोसन पूरन आणि दीपक हुडा अशी तगडी बॅटींग ऑर्डर पंजाबकडं आहे. तर यंदा आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या शाहरुख खाननंही सर्वांना चांगलंच प्रभावित केलं आहे. पंजाबच्या बॉलिंगची धुरा अनुभवी मोहम्मद शमीच्या खांद्यावर आहे. सनरायझर्स हैदराबादची Playing 11 : : डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, विजय शंकर, विराट सिंह, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान,  भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद, पंजाब किंग्जची Playing 11 : केएल राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, मोईसेस हेन्रिक्स, फॅबियन एलन, मोहम्मद शमी, एम. अश्विन आणि अर्शदीप सिंग
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, David warner, IPL 2021, Kl rahul, Punjab kings, Sports, SRH

    पुढील बातम्या