मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: डेव्हिड वॉर्नरची हकालपट्टी, SRH नं कॅप्टन बदलला

IPL 2021: डेव्हिड वॉर्नरची हकालपट्टी, SRH नं कॅप्टन बदलला

या आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) टीममधून मोठी बातमी आहे. टीमच्या या खराब कामगिरीमुळे  डेव्हिड वॉर्नर (David Warner) याची कर्णधारदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

मुंबई, 1 मे : या आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) टीममधून मोठी बातमी आहे. हैदराबादनं 6 पैकी 5 मॅच गमावल्या असून फक्त 1 मॅच जिंकली आहे. टीमच्या या खराब कामगिरीमुळे  डेव्हिड वॉर्नर (David Warner) याची कर्णधारदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. वॉर्नरच्या जागी केन विल्यमसन (Kane Williamson) याची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे. सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही घोषणा केली आहे.

सनरायझर्स हैदराबादची पुढील मॅच उद्या (रविवारी) राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. या मॅचपासून उर्वरित आयपीएल सिझनमध्ये केन विल्यमसन हा टीमचा नवा कॅप्टन असेल. राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये नव्या विदेशी खेळाडूंसह टीम उतरणार आहे. असंही या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये डेव्हिड वॉर्नरचे आभार मानले असून तो यापूढे देखील टीमला मदत करेल अशी आशा व्यक्त केली आहे.

वॉर्नरसाठी खराब सिझन

डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी बॅट्समन आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये 50 अर्धशतक झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. सनरायझर्स हैदराबादचा यशस्वी कॅप्टन अशी वॉर्नरची ओळख आहे. मात्र वॉर्नरसाठी हा सिझन खराब ठरला आहे. त्यानं या आयपीएल सिझनमध्ये 6 मॅचमध्ये  32.16 च्या सरासरीनं 193 रन केले आहेत. हे रन वॉर्नरच्या दर्जापेक्षा कमी आहेत.

हैदराबादचा पाच सामन्यात 5 सामन्यात पराभव झाल्यामुळे आता 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यासाठी  त्यांना पुढील प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. त्यामुळे हैदराबादच्या मॅनेजमेंटनं अनुभवी केन विल्यमसनकडं टीमची जबाबदारी सोपवली आहे. विल्यमसन हा न्यूझीलंडचा कॅप्टन असून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. तसंच 2018 मध्ये वॉर्नरच्या अनुपस्थितीमध्ये त्यानं टीमचं नेतृत्त्व केलं आहे.

First published:
top videos

    Tags: David warner, IPL 2021, SRH