मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून आऊट

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून आऊट

नटराजनला (T. Natarajan) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत पुन्हा बळावली असून त्यामुळे तो उर्वरित आयपीएल स्पर्धेतून आऊट झाला आहे.

नटराजनला (T. Natarajan) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत पुन्हा बळावली असून त्यामुळे तो उर्वरित आयपीएल स्पर्धेतून आऊट झाला आहे.

नटराजनला (T. Natarajan) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत पुन्हा बळावली असून त्यामुळे तो उर्वरित आयपीएल स्पर्धेतून आऊट झाला आहे.

चेन्नई, 23 एप्रिल: आयपीएल स्पर्धेच्या या सिझनमध्ये (IPL 2021) प्रत्येक टीमचे 3 किंवा 4 सामने झाले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीचा टप्पा सध्या सुरु असून यामध्ये काही खेळाडूंनी बायो-बबलमुळे तर काहींनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे. सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) स्टार बॉलर टी. नटराजनचा (T. Natarajan) देखील या यादीमध्ये समावेश झाला आहे. नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत पुन्हा बळावली असून त्यामुळे तो उर्वरित आयपीएल स्पर्धेतून आऊट झाला आहे. सनरायझर्स हैदराबादनं नटराजनच्या जागी कोणत्याही खेळाडूची निवड अद्याप केलेली नाही.

नटराजननं या आयपीएलमध्ये फक्त 2 सामनेच खेळले आहेत. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे अंतिम 11 मधून वगळले होते. गुरुवारी हैदराबादच्या टीमनं या सिझनमधील पहिला विजय मिळवला. त्यावेळी त्यांचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं सांगितले होते की, " नटराजनचा गुडघा दुखवला आहे. त्यासाठी स्कॅनची आवश्यकता आहे. स्कॅन करण्यासाठी त्याला बायो-बबल सोडावं लागेल. त्यानंतर पुन्हा सात दिवस क्वारंटाईन राहून तो पुन्हा टीममध्ये येऊ शकतो,'' 'ईएसपीएन क्रिकइन्फो' नं हे वृत्त दिलं आहे.

नटराजननं मागील आयपीएलमध्ये (IPL 2020) भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) अनुपस्थितीमध्ये टीमच्या बॉलिंगची जबाबदारी सांभाळली होती. डेथ ओव्हर्समध्ये भेदक यॉर्कर टाकण्यात तो तज्ज्ञ आहे. आयपीएल स्पर्धेनंतर त्याचा टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट बॉलर म्हणून निवड झाली होती. त्या दौऱ्यात त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. एकाच दौऱ्यात क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात पदार्पण करणारा नटराजन हा पहिला भारतीय खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच नटराजनला दुखापत झाली होती. मात्र बीसीसीआयनं याबाबत कोणतीही माहिती सुरुवातीला दिली नाही. नटराजन या दुखापतीमुळे  इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी20 आणि वन-डे मालिकेतील बहुतेक मॅच खेळू शकला शकला नव्हता. आता त्याला आयपीएल स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागत आहे.

डेव्हिड वॉर्नरला आऊट करताच पंजाबच्या खेळाडूनं मैदानात केला डान्स, VIDEO

सनरायझर्सकडं सध्या भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, बासिल थंपी आणि जेसन होल्डर अशी फास्ट बॉलर्सची फौज आहे. मागील दोन सामन्यात खलिल अहमद नटराजनच्या अनुपस्थितीमध्ये खेळला आहे.

First published:

Tags: Cricket news, IPL 2021, Sunrisers hyderabad