मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021, SRH vs RR : कॅप्टन बदलूनही हैदराबादच्या अडचणी संपेना, आता राजस्थानने लोळवलं

IPL 2021, SRH vs RR : कॅप्टन बदलूनही हैदराबादच्या अडचणी संपेना, आता राजस्थानने लोळवलं

 आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) खराब कामगिरी करणाऱ्या हैदराबादच्या टीमने (SRH) डेव्हिड वॉर्नरला (David Warner) डच्चू देऊन केन विलियमसनकडे (Kane Williamson) नेतृत्व दिलं, पण कर्णधार बदलल्यानंतरही हैदराबादसमोरच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा (SRH vs RR) 55 रननी पराभव झाला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 2 मे:  आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) खराब कामगिरी करणाऱ्या हैदराबादच्या टीमने (SRH) डेव्हिड वॉर्नरला (David Warner) डच्चू देऊन केन विलियमसनकडे (Kane Williamson) नेतृत्व दिलं, पण कर्णधार बदलल्यानंतरही हैदराबादसमोरच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा (SRH vs RR) 55 रननी पराभव झाला आहे. राजस्थानने दिलेलं 221 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 165 रन करता आले. हैदराबादच्या एकाही बॅट्समनला अर्धशतकही करता आलं नाही. मनिष पांडेने (Manish Pandey) सर्वाधिक 31 रन केले. राजस्थानच्या मुस्तफिजुर आणि क्रिस मॉरिस यांना सर्वाधिक 3-3 विकेट मिळाल्या. तर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचनंतर पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थानने 7 पैकी 3 सामने जिंकले असून 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, तर हैदराबादला या मोसमात 7 पैकी फक्त 1 मॅच जिंकता आली.

जॉस बटलरच्या (Jos Buttler) वादळी शतकामुळे राजस्थान रॉयल्सने हैदराबादला (SRH vs RR) विजयासाठी 221 रनचं आव्हान दिलं. बलटरने 64 बॉलमध्ये 124 रनची खेळी केली, यामध्ये 8 सिक्स आणि 11 फोरचा समावेश होता. तर कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) 33 बॉलमध्ये 48 रन केले. रियान पराग 15 रनवर आणि डेव्हिड मिलर 7 रनवर नाबाद राहिला. हैदराबादकडून संदीप शर्मा, राशिद खान आणि विजय शंकर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा  कॅप्टन केन विल्यमसननं  टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा  निर्णय घेतला. हैदाराबादच्या टीमनं या मॅचमध्ये एक मोठा बदल केलाय. डेव्हिड वॉर्नरला (David Warner) राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये वगळण्यात आलं. वॉर्नर हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी बॅट्समन आहे. या सिझनमध्येही तो हैदराबादचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॅट्समन आहे. तरीही हैदराबादनं त्याला वगळलंय. राजस्थान विरुद्ध नव्या विदेशी खेळाडूंच्या कॉम्बिनेशनसह हैदराबादची टीम उतरणार असल्याचं टीम मॅनेजमेंटनं जाहीर केलं होतं. त्यानुसार वॉर्नरला टीममधून वगळण्यात आलं.

डेव्हिड वॉर्नरच्या जागी मोहम्मद नबीचा समावेश करण्यात आला. अनुभवी बॉलर भुवनेश्वर कुमार आणि आक्रमक बॅट्समन अब्दुल समादचं टीममध्ये दुखपापतीमुळे पुनरागमन झालं. तर राजस्थानच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आले. शिवम दुबेच्या जागी अनुज रावतचा समावेश करण्यात आला. तर जयदेव उनाडकतच्या जागी कार्तिक त्यागी या सिझनमधील पहिलीच मॅच खेळला.

First published:

Tags: David warner, IPL 2021, Rajasthan Royals, Sunrisers hyderabad