मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: नितीश राणानं फोर लगावताच झालं मोठं नुकसान, राशिद खानचा बदलला चेहरा! VIDEO

IPL 2021: नितीश राणानं फोर लगावताच झालं मोठं नुकसान, राशिद खानचा बदलला चेहरा! VIDEO

कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) रविवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 6 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये कोलकाताचा बॅटर नितिश राणा (Nitish Rana) यानं लगावलेल्या फोरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 ऑक्टोबर : कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) रविवारी झालेल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 6 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये कोलकाताचा बॅटर नितिश राणा (Nitish Rana) यानं फोर लगावतात ब्रॉडकास्टर्सचा कॅमेरा फुटला. त्यानंतर राशिद खानची (Rashid Khan) प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. कोलकाताच्या इनिंगमधील 17 व्या ओव्हरमध्ये नितिश राणानं जेसन होल्डरच्या बॉलवर हा फोर लगावला होता.

नितिशनं मारलेला बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याच्या लेन्सला लागला. त्यानंतर राशिद खान तो कॅमेरा पाहात होता. त्यानंतर पुढच्याच बॉलला नितिश आऊट झाला. त्यानं 33 बॉलमध्ये 3 फोरच्या मदतीनं 25 रन काढले. त्यानं आऊट होण्यापूर्वी मारलेला हा फोरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

हैदराबादने दिलेलं 116 रनचं आव्हान केकेआरने 19.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पूर्ण केलं. शुभमन गिलने (Shubhaman Gill) 51 बॉलमध्ये सर्वाधिक 57 रन केले. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर राशिद खान आणि सिद्धार्थ कौलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यामध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही.

हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून फक्त 115 रन केले. केन विलियमसनने 26, अब्दुल समदने 25 आणि प्रियम गर्गने 21 रन केले. कोलकात्याकडून टीम साऊदी, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर शाकिब अल हसनला एक विकेट घेण्यात यश आलं.

IPL 2021: कोहलीसोबत येताच बदललं नशीब, मागच्या सिझनचा झिरो यंदा बनला हिरो

प्ले-ऑफची रेस

हैदराबादविरुद्धच्या या विजयाबरोबरच कोलकात्याचे 13 मॅचमध्ये 6 विजय आणि 7 पराभवांसह 12 पॉईंट्स झाले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर चौथ्या क्रमांकावर आहे. तसंच त्यांचा नेट रन रेटही +0.294 इतका आहे. कोलकात्याच्या या विजयामुळे पंजाबचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न संपुष्टात आलं आहे. तर राजस्थान आणि मुंबईसाठीही प्ले-ऑफ गाठणं आता कठीण होऊन बसलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबईने 12 पैकी 5 सामने जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात प्रत्येकी 10-10 पॉईंट्स आहेत. राजस्थानचा नेट रन रेट -0.337 एवढा आहे, तर मुंबईचा नेट रन रेट -0.453 आहे. याच नेट रन रेटमुळे राजस्थान सहाव्या आणि मुंबई सातव्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: IPL 2021, KKR, SRH