नवी दिल्ली: या आयपीएल सिझनमधील (IPL 2021) दिल्लीतील पहिली मॅच गुरुवारी होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (SRH vs CSK) यांच्यात ही मॅच आहे.चेन्नईनं या आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केलीय. महेंद्रसिंह धोनीच्या टीमनं पाच पैकी चार सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) हैदराबादची याच्या नेमकी उलट परिस्थिती आहे. हैदराबादचा पाचपैकी चार सामन्यात पराभव झाला असून फक्त एकाच सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे.
दक्षिण भारतामधील या दोन टीममध्ये होणाऱ्या लढतीत आणखी एका लढतीकडं सर्वांचं लक्ष असेल. सनरायझर्स हैदराबादचा विजय शंकर (Vijay Shankar) आणि चेन्नई सुपर किंग्सचा अंबाती रायुडू (Ambati Rayudu) हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध या मॅचमध्ये खेळतील. 2019 च्या वर्ल्ड कपपूर्वी घडलेल्या एक कटू प्रसंगाची आठवण आजही क्रिकेट फॅन्सना आहे. त्यामुळे ते दोघं एकमेकांविरुद्ध कसं खेळणार याकडं सर्वांचं लक्ष असेल.
काय घडला होता प्रसंग?
इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियामध्ये अंबाती रायुडू हा प्रबळ दावेदार होता. मिडल ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या रायुडूच्या ऐवजी निवड समिती समितीनं विजय शंकरची टीम इंडियात निवड केली. शंकर हा बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तीन्ही क्षेत्रातील कामगिरीमुळे (3 D) शंकरची टीममध्ये निवड झाली, असा दावा निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद (MSK Prasad) यांनी केला होता.
रायडुनं प्रसाद यांच्या या दाव्याला ट्विटरवरुन खरबरीत उत्तर दिलं होतं."मी वर्ल्ड कप पाहण्यासाठी नुकताच 3 चष्मा मागवला आहे,'' असं ट्विट रायुडूनं तेंव्हा केलं होतं. रायुडूचे हे ट्विट त्यावेळी प्रचंड गाजलं. ते ट्विट क्रिकेट फॅन्सच्या आजही लक्षात आहे.
Just Ordered a new set of 3d glasses to watch the world cup 😉😋..
— Ambati Rayudu (@RayuduAmbati) April 16, 2019
IPL 2021: डीव्हिलियर्सचा कमी बॉलमध्ये मोठा रेकॉर्ड! विराट, रोहितला टाकलं मागं
आता बुधवारी होणाऱ्या मॅचमध्ये शंकर आणि रायुडू हे दोघं काय कामगिरी करतात? त्यांच्यात कोण सरस ठरतं याची सर्वांना उत्सुकता आहे. रायुडूनं या आयपीएलमध्ये 4 इनिंगमध्ये 16 च्या सरासरीनं 64 रन काढले आहेत. तर विजय शंकरनं 5 इनिंगमध्ये 12.50 च्या सरासरीनं 50 रन काढले आहेत. तसंच 2 विकेट्स घेतल्या आहेत. या दोन्ही खेळाडूंसाठी हा सिझन निराशाजनक ठरला आहे. आता या महत्त्वाच्या लढतीत कोण सरस खेळ करणार हे बुधवारी रात्री स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.