नवी दिल्ली, 5 मे: सनरायझर्स हैदराबादचा (SRH) बॅट्समन डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्यासाठी हा आयपीएल सिझन अत्यंत निराशाजनक गेला. त्याच्या कॅप्टनसीमध्ये हैदराबादनं सहापैकी पाच मॅच गमावल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे वॉर्नरची कॅप्टनपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्याचबरोबर त्याची टीममधील जागा गेली. हैदराबादच्या इतिहासात 2014 पासून हा प्रसंग पहिल्यांदाच घडला.
हैदराबादच्या मॅनेजमेंटनं उर्वरित सिझनसाठी केन विल्यमसन (Kane Williamson) याची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. तर राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (SRH vs RR) मोहम्मद नबीला (Mohammad Nabi) वॉर्नरच्या जागी खेळवलं. या निर्णयावर 'ऑरेंज आर्मी' (Orange Army) म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनेक हैदराबादच्या फॅन्सनी नाराजी व्यक्त केली होती.
डेव्हिड वॉर्नर हा त्याच्या मैदानावरील कामगिरीप्रमाणेच आणखी एका कारणामुळे भारतीय फॅन्समध्ये लोकप्रिय आहे. वॉर्नर हा भारतीय संगीत विशेषत: तेलुगु गाण्यांचा मोठा फॅन्स आहे. या गाण्यावरील अनेक टिकटॉक व्हिडीओ त्यानं यापूर्वी बनवले आहेत. ते व्हायरल देखील झाले आहेत.
आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानं खेळाडूंना घरी परत जाण्याची परवानगी मिळाली आहे. पण वॉर्नरसह अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू अजून भारतामध्येच आहेत. हा रिकामा वेळ घालवण्यासाठी वॉर्नर हॉटेलमध्ये Butta Bomma प्रसिद्ध तेलुगु गाणं ऐकून वेळ घालवत आहे. वॉर्नरच स्वत: इन्स्टाग्रामवर (Instagram) ही माहिती दिली आहे.
IPL 2021 संपताच मुंबईच्या खेळाडूची किचनमध्ये ड्यूटी, पाहा त्यानं कोणता पदार्थ केला तयार
'बाबा लवकर घरी ये'
आयपीएल स्थगित झाल्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने एक इमोशनल फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. डेव्हिड वॉर्नर याच्या मुलीने हे चित्र काढलं आहे. 'बाबा, लवकर घरी ये, तुझी आठवण येत आहे,' असं वॉर्नरच्या मुलीने या चित्रात लिहिलं आहे. डेव्हिड वॉर्नरला इव्ही, इंडी आणि इस्ला अशा तीन मुली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, David warner, IPL 2021, Sports, Sunrisers hyderabad