IPL 2021: रोहित शर्मा दिसताच सुपर फॅननं केली आरती, पाहा Viral Video

IPL 2021: रोहित शर्मा दिसताच सुपर फॅननं केली आरती, पाहा Viral Video

रोहित शर्माचे जगभर फॅन्स आहेत. शुक्रवारी झालेल्या आयपीएल मॅच दरम्यानचा रोहितच्या एका सुपर फॅनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.

  • Share this:

चेन्नई, 10 एप्रिल : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. सर्वात जास्त पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या टीमचा तो कॅप्टन आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा (Team India) देखील तो व्हाईस कॅप्टन आणि बॅटिंगमधील मुख्य आधारस्तंभ आहे. आक्रमक बॅट्समन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितला त्याचे फॅन्स हिटमॅन (Hitman) म्हणून देखील ओळखतात.

रोहित शर्माचे जगभर फॅन्स आहेत. शुक्रवारी झालेल्या आयपीएल  मॅच दरम्यानचा रोहितच्या एका सुपर फॅनचा व्हिडीओ सध्या  सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. मुंबई इंडियन्सची बॅटींग सुरु झाल्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. रोहित शर्मा बॅटींगला आलेलं पाहताच त्याचा 'सुपर फॅन' कमालीचा आनंदी झाला. रोहित शर्मा टीव्हीवर दिसत असल्यानं त्यानं थेट टीव्हीचीच आरती केली.

रोहित शर्माला पहिल्या मॅचमध्ये मोठी खेळी करायला अपयश आलं. त्यानं सुरुवात आश्वासक केली होती. पण चौथ्या ओव्हरमध्ये क्रिस लीन सोबत उडालेल्या गोंधळचा फटका त्याला बसला. विराट कोहलीनं केलेल्या थेट थ्रो मुळे रोहित शर्मा 19 रनवर रन आऊट झाला.

(9 वर्षांची परंपरा कायम राखल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...)

पाकिस्तानविरुद्धची सीरिज खेळून आलेला दक्षिण आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डिकॉक  अजूनही आयसोलेशनमध्ये आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी क्रिस लीनला संधी देण्यात आली होती. क्रिस लीनचा मुंबई इंडियन्ससाठीचा हा पहिलाच सामना होता.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही  मुंबई इंडियन्सची  सुरूवात खराब झाली आहे. या वर्षाच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबईचा 2 विकेटनं पराभव केला.

Published by: News18 Desk
First published: April 10, 2021, 2:30 PM IST

ताज्या बातम्या