मुंबई, 25 एप्रिल : क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 24 एप्रिल रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्याला जगभरातून शुभेच्छा देण्यात आल्या. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) देखील या निमित्तानं एक व्हिडीओ शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.सीएसकेनं फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यानं सचिननं दिलेल्या सल्ल्यानं कसा बदल झाला याची आठवण सांगितली आहे.
शार्दुलनं या व्हिडीओत सांगितले आहे की, "मास्टर ब्लास्टरनं त्याला सतत क्रिकेटचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. मॅच नसेल त्या दिवशी देखील लेंथ आणि पेसचा सराव केला तरच फायदा होईल, असा सल्ला सचिननं दिला होता," अशी आठवण शार्दुलनं सांगितली आहे.
शार्दुलनं यावेळी रणजी ट्रॉफीतील कि्स्सा देखील शेअर केला. "माझ्या आठवणीनुसार एका रणजी ट्रॉफी फायनलपूर्वी किंवा रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर मी सचिनशी एका विषयावर चर्चा करत होतो. तो मला लाईनबद्दल समजावून सांगत होता. त्यावेळी सचिननं अचानक फ्लॅश बॅकमध्ये गेला. मी तुला लाईन आणि लेंथबद्दल सांगितलं होतं, हे तुझ्या लक्षात नाही. त्यामुळेच तू असं करत आहेस. मॅच नसेल त्या दिवशी देखील कठोर अभ्यास कर, त्यानंतरच तुला यश मिळेल '' असं सचिननं आपल्याला सांगितल्याचं शार्दुलनं म्हंटलं आहे.
Master's guidance can never go wrong! Shardul recollects his Dhool memory of Sachin on the legends b'day!#HappyBirthdaySachin #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/qNX9EH7IAQ
— Chennai Super Kings - Mask Pdu Whistle Pdu! (@ChennaiIPL) April 24, 2021
(वाचा : पांड्या बंधूंचा संघर्ष, रोहितसमोर आहेत या खेळाडूंचे पर्याय )
शार्दुल ठाकूरनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन टेस्टमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे आणि टी20 मालिकेतही त्यानं निर्णायक क्षणी विकेट्स घेतल्या होत्या. शार्दुल या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. त्यानं या सिझनमधील 4 मॅचमध्ये 11.27 च्या इकॉनॉमी रेट्सनं फक्त 3 विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, IPL 2021, Sachin tendulkar