मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : केकेआरच्या ‘या’ खेळाडूची देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला पसंती, कसोटी मालिकेतून माघार

IPL 2021 : केकेआरच्या ‘या’ खेळाडूची देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला पसंती, कसोटी मालिकेतून माघार

जगातील सर्वात प्रतिष्ठेची टी-20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी सिझनचे (IPL 2021) पडघम आता वाजू लागले आहेत.

जगातील सर्वात प्रतिष्ठेची टी-20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी सिझनचे (IPL 2021) पडघम आता वाजू लागले आहेत.

जगातील सर्वात प्रतिष्ठेची टी-20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी सिझनचे (IPL 2021) पडघम आता वाजू लागले आहेत.

मुंबई, 19 फेब्रुवारी : जगातील सर्वात प्रतिष्ठेची टी-20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी सीझनचे (IPL 2021) पडघम आता वाजू लागले आहेत. या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction) गुरुवारी पार पडला. या लिलावानंतर सर्व टीम आता प्रत्यक्ष स्पर्धेच्या तयारीला लागतील. क्रिकेटपटूंना सर्वात जास्त पैसा देणाऱ्या या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा जास्त प्राधान्य देण्याच्या घटना यापूर्वी क्रिकेट विश्वात घडल्या आहेत. आता या यादीमध्ये आणखी एका खेळाडूची भर पडली आहे.

Cricbuzz नं दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसननं (Shakib al-hasan) आयपीएलसाठी श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे ऑपरेशन संचालक अक्रम खान यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. बांगलादेश बोर्डानं शाकिबला याबाबतची परवानगी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. श्रीलंकेतील वन-डे मालिकेनमंतर शाकिब आयपीएल खेळण्यासाठी उपलब्ध असेल.

शाकिबचं एक वर्षाच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) 3 कोटी 20 लाखांमध्ये खरेदी केलं आहे. शाकिब यापूर्वी 2012 ते 2017 या काळात केकेआरचा सदस्य होता. केकेआरनं 2012 आणि 2014 साली मिळवलेल्या विजेतेपदामध्ये त्याचं योगदान होतं. त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबादकडूनही (SRH) तो आयपीएलमध्ये खेळला आहे.

'आयपीएल स्पर्धेत खेळता यावं म्हणून श्रीलंका विरुद्ध होणारी कसोटी मालिका न खेळण्याबाबतचं पत्र त्यानं आम्हाला दिलं आहे. आम्ही त्याला त्याची परवानगी दिली आहे. ज्या व्यक्तीला राष्ट्रीय टीमकडून खेळण्याची इच्छा नाही, त्याला थांबवण्यात काहीच अर्थ नाही,' असं खान यांनी स्पष्ट केले.

(हे वाचा : टेम्पोचालकाच्या मुलावर लागली 1कोटी 20 लाखांची बोली; आता कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार )

शाकिब अल हसनला सलग दुसऱ्यांदा बांगलादेशकडून न खेळण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी त्याला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी पितृत्वाची रजा (Paternity leave) मंजूर करण्यात आली आहे. बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिका मार्च महिन्यात होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, IPL 2021, Ipl 2021 auction