मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: CSK साठी आनंदाची बातमी, धोनीचा सर्वात खास सहकारी UAE मध्ये खेळणार

IPL 2021: CSK साठी आनंदाची बातमी, धोनीचा सर्वात खास सहकारी UAE मध्ये खेळणार

आयपीएल स्पर्धेचे (IPL 2021) उर्वरित सामने आता युएईमध्ये होणार आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

आयपीएल स्पर्धेचे (IPL 2021) उर्वरित सामने आता युएईमध्ये होणार आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

आयपीएल स्पर्धेचे (IPL 2021) उर्वरित सामने आता युएईमध्ये होणार आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 31 मे: आयपीएल स्पर्धेचे (IPL 2021) उर्वरित सामने आता युएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयच्या (BCCI) शनिवारी झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने ही स्पर्धा 4 मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उर्वरित 31 सामने यूएईमध्ये होणार आहेत. यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू पूर्ण वेळ खेळणार का? याची सर्व फ्रँचायझींना काळजी आहे. इंग्लंड बोर्डाने यापूर्वीच त्यांचे खेळाडू ही स्पर्धा खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू देखील कॅरेबियन प्रीमियर लीगमुळे उशीरा दाखल होण्याची शक्यता असून ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही सहभाग अनिश्चित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्स  (CSK) साठी एक आनंदाची बातमी आहे. चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू आणि कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) विश्वासू सहकारी सुरेश रैना (Suresh Raina) हा उर्वरित आयपीएल सामने खेळणार आहे. रैनाने तसंच ट्विट करत जाहीर केले आहे. सुरेश रैना हा चेन्नईचा अगदी पहिल्या सिझनपासूनचा खेळाडू आहे. आयपीएल  चेन्नईकडून सर्वात जास्त रन रैनानेच काढले आहेत. रैनाने मागील आयपीएल स्पर्धा (IPL 2020) सुरु होण्यापूर्वी अगदी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. रैनाच्या अनुपस्थितीचा मोठा फटका चेन्नईला बसला. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला 'प्ले ऑफ' स्पर्धेत प्रवेश करता आला नव्हता. आता रैनाने युएईमध्ये खेळणार असल्याचं जाहीर केल्यानं चेन्नईच्या फॅन्सना मोठा दिलासा मिळाला आहे. See you soon Dubai 💪🏏 @msdhoni @IPL @ChennaiIPL pic.twitter.com/5nWAZZ5BqJ — Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) May 29, 2021 लय भारी! मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी वडिलांनी 5 एकर शेतातच तयार केलं जबरदस्त मैदान रैनाने आयपीएल 2021 मध्ये 6 इनिंगमध्ये 123 रन काढले आहेत. रैनानं या सिझनमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटींग केली. आता उर्वरित स्पर्धेत इंग्लंडचा मोईन अली (Moeen Ali) येणार नसल्याने तो पुन्हा एकदा नेहमीच्या तीन नंबरवर खेळण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी चेन्नईनं सात पैकी पाच सामने जिंकले असून 'यलो आर्मी' पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
First published:

Tags: Cricket, Csk, IPL 2021, Suresh raina

पुढील बातम्या