मुंबई, 26 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) टीमला शनिवारी दोन धक्के बसले. दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) त्यांचा 33 रननं पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानच्या टीमची पॉईंट टेबलमध्ये घसरण झाली असून त्यांची 'प्ले ऑफ' मधील वाटचाल खडतर झाली आहे. तर त्याचबरोबर त्यांचा कॅप्टन संजू सॅमसनसह (Sanju Samson) संपूर्ण टीमला शिक्षा झाली आहे.
संजू सॅमसन आणि राजस्थानच्या खेळाडूंना स्लो ओव्हर रेटसाठी शिक्षा करण्यात आली आहे. सॅमसनला 24 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. तर राजस्थानच्या खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा 25 टक्के मॅच फिस (दोन्हीमधील जी रक्कम कमी असेल) इतका दंड द्यावा लागणार आहे. आयपीएलच्या वतीनं एक पत्रक प्रसिद्ध करत याविषयावर माहिती देण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सकडून या स्पर्धेत दुसऱ्यांदा ही चूक घडली आहे. त्यामुळे त्यांना 24 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
संजू सॅमसन अडचणीत
आयपीएलच्या नियमांनुसार प्रत्येक टीमला निर्धारित वेळेमध्येच 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागतात, पण चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) यांनी हा नियम न पाळल्यानं आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
DC vs RR : आयपीएलच्या इतिहासात 10 वर्षानंतर राजस्थानच्या नावे असा लाजिरवाणा रेकॉर्ड
राजस्थान रॉयल्सनं हा नियम दुसऱ्यांदा मोडला आहे. त्यामुळे या स्पर्धेत पुन्हा एकदा ती चूक केल्यास संजू सॅमसनला एका मॅचसाठी निलंबित केलं जाईल.तसंच त्याला 30 लाखांचा दंड भरावा लागेल. त्यामुळे आता उर्वरित सामन्यांमध्ये सॅमसनवर निलंबनाची टांगती तलवार असेल.
दिल्लीचा राजस्थानवर 33 धावांनी विजय; कर्णधार संजू सॅमसनची 70 धावांची खेळी व्यर्थ
नियम काय सांगतो?
आयपीएल स्पर्धेत प्रत्येक टीमला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं अपेक्षित आहे. यापूर्वी 90 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू करावी असा नियम होता, पण आता निर्धारित दीड तासाच्या आत 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागणार आहेत. शिवाय या 90 मिनिटांत टीमला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक टीमला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर टाकणं अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक टीमला एका तासामध्ये 14.1 ओव्हर टाकावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.