Home /News /sport /

IPL 2021, RCB vs PBKS : आरसीबचं आव्हान पेलण्यासाठी पंजाबच्या टीममध्ये 3 बदल

IPL 2021, RCB vs PBKS : आरसीबचं आव्हान पेलण्यासाठी पंजाबच्या टीममध्ये 3 बदल

पंजाब किंग्जला (PBKS) या स्पर्धेत पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतायचं असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावं लागेल. या मॅचसाठी पंजाबनं 3 बदल केले आहेत.

    अहमदाबाद, 30 एप्रिल : पंजाब किंग्जला (PBKS) या स्पर्धेत पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतायचं असेल तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावं लागेल. यापूर्वी झालेल्या मॅचमध्ये पंजाबचा कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) 5 विकेट्सनं पराभव केला आहे. आरसीबीची चेन्नईतील एक मॅच वगळता प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. अहमदाबादमधील या मॅचमध्ये आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये आरसीबीनं एक बदल केला असून वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदचा टीममध्ये समावेश केला आहे. तर पंजाबच्या टीममध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. मयंक अग्रवाल जखमी असल्यानं ही मॅच खेळू शकणार नाही. तर मोईसेस हेन्रिक्स आणि अर्शदीप सिंग यांना टीममधून वगळण्यात आलंय. पंजाबच्या बॅट्समननी या स्पर्धेत निराशा केली आहे. मागच्या तीन मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या केएल राहुलच्या टीमनं पहिल्यांदा बॅटींग करताना 106, 120 आणि 123 असा कमी स्कोअर केला आहे. पंजाबच्या बॅटींगची भिस्त कॅप्टन राहुलवर असून त्याला मयंक अग्रवाल आणि ख्रिस गेल यांची साथ मिळाली तर आरसीबीची डोकेदुखी वाढू शकते. दुसरिकडं आरसीबीनं या स्पर्धेत सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सला एक रननं पराभूत केल्यामुळे या टीमच्या आत्मविश्वासात आणखी भर पडली आहे. एबी डीव्हिलियर्सचा फॉर्म ही आरसीबीची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्याच्या फटकेबाजीमुळेच आरसीबीला दिल्लीविरुद्ध विजय मिळवता आला होता. विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल आणि डीव्हिलियर्स या चौघांवर आरसीबीची बॅटींग अवलंबून आहे. या चौघांनीही या स्पर्धेत चांगला खेळ केल्यानं आरसीबीला त्याचा फायदा झाला आहे. त्याचबरोर हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज हे आरसीबीचे बॉलर्सही फॉर्मात आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची Playing 11 : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स, शाहबाद अहमद, डॅनियल सॅम्स, कायले जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल पंजाब किंग्जची Playing 11 : केएल राहुल, ख्रिस गेल, प्रभसिमरन सिंग, निकोलस पूरन, दीपक हुडा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, ख्रिस जॉर्डन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी आणि रिले मेरिडेथ
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या