IPL 2021: 'या' दौऱ्यानंतर बदलला सिराज, आता ठरतोय दिग्गजांची डोकेदुखी!

IPL 2021: 'या' दौऱ्यानंतर बदलला सिराज, आता ठरतोय दिग्गजांची डोकेदुखी!

रॉयल चॅलेंजर्सनं बंगळुरुनं (RCB) गुरुवारी मिळवलेल्या विजयात त्यांचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजचं (Mohammed Siraj) मोलाचं योगदान होतं.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्सनं बंगळुरुनं (RCB) गुरुवारी मिळवलेल्या विजयात त्यांचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजचं (Mohammed Siraj) मोलाचं योगदान होतं. राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 27 रन देत सिराजनं जोस बटलर, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातियांना आऊट केलं. यापैकी बटलर आणि मिलरच्या विकेट्स सिरजनं पहिल्या 6 ओव्हर्सच्या 'पॉवर प्ले' मध्ये घेतल्या.

सिराजनं मागच्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतही (IPL 2020) आरसीबीकडून चांगली कामगिरी केली होती. त्यानं मागच्या सिझनमध्ये पहिल्या 6 ओव्हर्सच्या 'पॉवर प्ले' मध्ये 6.92 च्या इकॉनॉमी रेटनं रन दिले होते. युएईमध्ये मागच्या वर्षी भरपूर रन निघत असताना सिराज त्याला अपवाद ठरला. अर्थात सिराजचे यापूर्वीच्या तीन आयपीएल सिझनमधील आकडेवारी  निराशाजनक होती.

सिराजनं आयपीएल 2019 मध्ये पॉवर प्ले मध्ये 10.14 च्या इकॉनॉमी रेटनं रन दिले होते. 2018 मध्ये 9.83 तर 2017 साली 11.00 च्या सरासरीनं सिराजनं रन दिले आहेत. सिराजला 2017 साली 10, 2018 मध्ये 11, 2019 मध्ये 7 तर 2020 मध्ये 11 विकेट्स मिळाल्या होत्या. या आयपीएलमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 5.57 असून त्यानं पहिल्या 4 मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.

कधी बदलला सिराज?

आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) मते ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सिराज संपूर्ण बदलला आहे. सिराजनं भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत टीम इंडियाकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं त्याच्या आजवरच्या टी20 कारकिर्दीमध्ये 70 मॅचमध्ये 92 विकेट्स घेतल्या आहेत. एकाच मॅचमध्ये 4 विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं 4 वेळा केली आहे.

IPL 2021: देवदत्त पडिक्कल कुणाचा? थरुर आणि माजी क्रिकेटपटूमध्ये जुंपली

याशिवाय सिराजनं 43 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 143 तर 46 लिस्ट A मॅचमध्ये 81 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 9 मॅचमध्ये त्याच्या नावावर 19 विकेट्स आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) नुकताच त्याचा वार्षिक करार यादीमध्ये देखील समावेश केला आहे.

Published by: News18 Desk
First published: April 23, 2021, 12:52 PM IST

ताज्या बातम्या