Home /News /sport /

IPL 2021: RCB चे कोच धोनीला म्हणाले 'मास्टर', CSK बद्दल केलं मोठं वक्तव्य

IPL 2021: RCB चे कोच धोनीला म्हणाले 'मास्टर', CSK बद्दल केलं मोठं वक्तव्य

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चे हेड कोच सायमन कॅटीच (Simon Katich) यांनी चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) प्रशंसा केली आहे.

    मुंबई, 25 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चे हेड कोच सायमन कॅटीच (Simon Katich) यांनी चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) प्रशंसा केली आहे. त्यांनी धोनीला 'मास्टर' असं म्हंटलं असून आपल्या मनात सीएसकेबद्दल मोठा आदर असल्याचं सांगितलं आहे. चेन्नई आणि बंगळुरु या दोन टीममध्ये रविवारी लढत आहे. सध्या पॉईंट टेबलमध्ये बंगळुरुची टीम पहिल्या तर चेन्नईची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅटीच यांनी आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हंटलं आहे की, "धोनी मास्टर आहे यामध्ये कोणतीही शंका नाही. त्याच्या टीमनं या सिझनची चांगली सुरुवात केली आहे.सीएसकेकडं चांगले खेळाडू असून आम्ही त्यांचा सन्मान करतो. सीएसकेची बॅटींग ऑर्डर मजबूत आहे. पण आमच्या बॉलर्सनी चांगली कामगिरी केलीय. यावेळी सीएसके विरुद्धचा सामना नक्कीच चांगला होईल." आरसीबीचा फास्ट बॉलर केन रिचर्डसन यानं या सिझनमधील पहिली मॅच राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध गुरुवारी खेळली होती. तो देखील या मॅचसाठी उत्साहात आहे." चेन्नईचे बॅट्समन आरसीबीच्या बॉलर्ससमोर मोठं आव्हान आहे. वानखेडे स्टेडियममधील परिस्थितीवर सर्व काही अवलंबून असेल. सीएसकेचे ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यू प्लेसिस हे ओपनिंग बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आम्ही त्यांच्या विरुद्ध निश्चित योजनेसह उतरणार आहोत. सीएसकेकडं मोठं अनुभव आहे. त्याच्या टीमनं आयपीएलचं विजेतेपद देखील पटकावलं आहे, ही लढत चांगली होईल,'' असं मत रिचर्डसननं व्यक्त केलं. IPL 2021: वादग्रस्त कृतीवर पोलार्डचं स्पष्टीकरण, टीकाकारांना उद्देशून म्हणाला... या सिझनमध्ये आरसीबीनं सलग चार सामने जिंकले असून विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये खेळणारी ही टीम 8 पॉईंट्ससह पॉईंट टेबलमध्ये अव्वल आहे. तर चेन्नईनं चार पैकी तीन सामने जिंकले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Csk, IPL 2021, MS Dhoni, RCB, Sports, Virat kohli

    पुढील बातम्या