मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: 9 वर्षांची परंपरा कायम राखल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

IPL 2021: 9 वर्षांची परंपरा कायम राखल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग नवव्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतील पहिली मॅच जिंकण्यात अपयश आलं आहे. या पराभवानंतरही मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झालेला नाही.

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग नवव्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतील पहिली मॅच जिंकण्यात अपयश आलं आहे. या पराभवानंतरही मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झालेला नाही.

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग नवव्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतील पहिली मॅच जिंकण्यात अपयश आलं आहे. या पराभवानंतरही मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झालेला नाही.

चेन्नई, 10 एप्रिल: मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग नवव्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतील पहिली मॅच जिंकण्यात अपयश आलं आहे. या पराभवानंतरही मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झालेला नाही. विजेतेपद पटकावणं हे आमचं लक्ष्य आहे. पहिली मॅच जिंकणं नाही, असं रोहितनं या मॅचनंतर बोलताना स्पष्ट केलं. शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) मुंबई इंडियन्सचा 2 विकेट्सनं पराभव केला."आम्ही आमच्या स्कोअरवर समाधानी नव्हतो. आम्ही 20 रन कमी बनवले," असं रोहितनं सांगितलं.

रोहित म्हणाला की, "आम्ही काही चुका केल्या,पण असं होतं. या चुका विसरुन आम्हाला पुढं जावं लागेल. पिच बॅटींगसाठी सोपं नव्हतं. आम्हाला पुढच्या मॅचमध्ये या विषयावर विचार करावा लागेल. शेवटच्या चार ओव्हरमध्ये डीव्हिलिर्सची विकेट आम्हाला हवी होती. त्यामुळेच  बुमराह आणि बोल्टला बॉलिंग दिली, पण त्यात यश मिळालं नाही."

आमच्याकडं अनेक पर्याय - कोहली

आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या विजयानं खूश आहे. "मागच्या वर्षी देखील आम्ही पहिली मॅच जिंकली होती. टीम समजण्यासाठी मजबूत टीमसह खेळणं आवश्यक आहे. प्रत्येकानं त्याचं योगदान दिलं. आमच्याकडे अनेक पर्याय होते. त्यामुळेच आम्ही कमबॅक करु शकलो. पहिल्या इनिंगमध्ये पिच चांगली वाटत होती. मात्र त्यानंतर बॉल थांबून बॅटवर येत होता. त्यामुळे पार्टनरशिप महत्त्वाची होती, असं विराटनं स्पष्ट केलं.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सची बॅटिंग गडगडली. या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) कर्णधार विराट कोहली  याने टॉस जिंकून पहिले मुंबईला बॅटिंगला बोलावलं, यानंतर मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 159 रन केले.

(IPL 2021: मॅक्सवेलनं संपवला 1079 दिवसांचा दुष्काळ, विराटला बसला धक्का! )

बंगळुरुच्या हर्षल पटेलने (Harshal Patel) 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 5 विकेट घेतल्या. तर काईल जेमिसन आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेणारा हर्षल पटेल हा पहिलाच बॉलर ठरला आहे. मुंबईकडून या सामन्यात क्रिस लीनने सर्वाधिक 49 रन केले, तर सूर्यकुमार यादवने 31 आणि इशान किशनने 28 रनची खेळी केली.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, RCB, Rohit sharma, Virat kohli