Home /News /sport /

IPL 2021: सलग दुसऱ्या मॅचमध्ये रोहित शर्माचा बुटांवर 'स्पेशल मेसेज', वाचून वाटेल हिटमॅनचा अभिमान!

IPL 2021: सलग दुसऱ्या मॅचमध्ये रोहित शर्माचा बुटांवर 'स्पेशल मेसेज', वाचून वाटेल हिटमॅनचा अभिमान!

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) या आयपीएलचा उपयोग पर्यावरण जागृतीसाठी करत आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये (MI vs KKR) रोहित विशेष बूट घालून मैदानात उतरला होता.

  चेन्नई, 14 एप्रिल : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) या आयपीएलचा उपयोग पर्यावरण जागृतीसाठी करत आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये (MI vs KKR) रोहित विशेष बूट घालून मैदानात उतरला होता. त्यानं मंगळवारच्या मॅचमध्ये 'प्लॅस्टीक मुक्त महासागार' (Plastic Free Ocean) हा संदेश रोहितनं यावेळी दिला. त्यानं या संबंधी जागृती करण्यासाठी निळ्या रंगाच्या पाण्यातील मोठा कासवाचा फोटो असलेले बूट घातले होते. रोहितनं इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) लिहून एक याचा मेसेजचा अर्थ सांगितला आहे. "दुसरे कारण माझ्या ऱ्हदयाच्या अगदी जवळचं आहे. ही एक अवघड हीट आहे. ही परिस्थिती संपूर्णपेणे बदलणं आपल्या हातामध्ये आहे. मी मैदानात उतरतो त्यावेळी मला जे चांगलं वाटतं, ते करतो. मी माझ्या मनाप्रमाणे वाटचाल करतो. पण या कारणामधील माझ्या वाटचालीसाठी मला तुमच्या सोबतीची गरज आहे. चला, आपण पुन्हा एकदा महासागर स्वच्छ करु या.'' अशी पोस्ट रोहितनं लिहली आहे.
  पहिल्या मॅचमध्येही दिला संदेश पहिल्या आयपीएल सामन्यात (IPL 2021) मैदानात उतरला. या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला असला तरी रोहित शर्माचं मात्र कौतुक होत आहे, कारण या मॅचमध्ये रोहितने त्याच्या बुटांवर खास मेसेज लिहिला होता. रोहितच्या बुटांवर एक शिंगी भारतीय गेंड्याचा फोटो होता. विलुप्त होत चाललेल्या या प्रजातीचं संरक्षण करण्यात यावं, असा संदेश देण्यासाठी रोहितने असे बूट घातले होते. तसंच त्याच्या बुटांवर सेव्ह द रायनो (गेंड्यांना वाचवा) असा संदेशही लिहिण्यात आला होता. ( बॉल टाकण्यापूर्वीच रोहित शर्माला दुखापत; VIDEO व्हायरल ) रोहितने हा फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरूनही शेयर केला आहे. 'एका दिवसाआधी मी जेव्हा आरसीबीविरुद्ध मैदानात खेळण्यासाठी उतरलो तेव्हा माझ्यासाठी ही फक्त एक मॅच नव्हती. क्रिकेट खेळणं हे कायमच माझं स्वप्न राहिलं. हे जग राहण्यासाठी आणखी चांगलं करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी हाच प्रयत्न करत आहे. हा हेतू मैदानापर्यंत घेऊन जाणं माझ्यासाठी खास होतं. ही गोष्ट माझ्या मनाच्या खूप जवळची आहे, यासाठीचं प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे,'  असं ट्विट रोहितनं केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians, Rohit sharma

  पुढील बातम्या