IPL 2021: राजस्थान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर ऋषभ पंत नाराज, म्हणाला...

IPL 2021: राजस्थान विरुद्ध झालेल्या पराभवानंतर ऋषभ पंत नाराज, म्हणाला...

ख्रिस मॉरीसच्या (Chris Morris) फटकेबाजीमुळे दिल्लीच्या हातातून मॅच निसटली. या पराभवानंतर दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) नाराज झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये  दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 3 विकेट्सनं पराभव केला. ख्रिस मॉरीसच्या (Chris Morris) फटकेबाजीमुळे दिल्लीच्या हातातून मॅच निसटली. या पराभवानंतर दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) नाराज झाला आहे. दिल्लीनं मॅच का हरली? या प्रश्नाचं उत्तर पंतनं दिलं आहे.

या पराभवानंतर बोलताना ऋषभ पंत म्हणाला, "माझ्या मते बॉलर्सनी सुरुवात चांगली केली होती. मात्र शेवटी आम्ही त्यांना (रॉयल्सचे बॅट्समन) वरचढ होण्याची संधी दिली. आम्ही आणखी चांगली बॉलिंग करु शकलो असतो. मैदानावर दव जास्त होता. आम्ही 15 ते 20 रन कमी केले. असं असलं तरी या मॅचमध्ये काही गोष्टी सकारात्मक घडल्या. बॉलर्सनी चांगली सुरुवात केली. भविष्यात आम्ही मॅच जिंकण्यात यशस्वी होऊ, अशी आशा आहे. पहिल्या इनिंगच्या तुलनेत दुसऱ्या इनिंगमध्ये दव जास्त होते. त्यामुळे आम्हाला काही गोष्टींमझ्ये बदल करावा लागला." असं पंतनं स्पष्ट केलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 147 रन केले. राजस्थान रॉयल्सनं हे आव्हान ख्रिस मॉरीसच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं. मॉरीसनं फक्त 18 बॉलमध्ये नाबाद 36 रन काढले. मॉरीसनं या खेळीत चार सिक्स लगावत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

( वाचा : 2 वेळा सलग 6 सिक्स, 40 ओव्हरमध्ये 200 रन करणारा 'हा' आहे पंतचा नवा साथीदार )

आयपीएल लिलावात सर्वात महाग ठरलेल्या ख्रिस मॉरीसनं निर्णायक क्षणी 'पैसा वसूल' खेळ करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला आहे. राजस्थानला 2 ओव्हरमध्ये 27 रन हवे होते. त्यावेळी मॉरीसनं कागिसो रबाडाच्या एकाच ओव्हरमध्ये 15 रन काढले. त्यानंतर त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये आवश्यक असलेले 12 रन फक्त 4 बॉलमध्ये पूर्ण केले.   राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) कडून डेव्हिड मिलरनं आक्रमक अर्धशतक झळकावत 62 रन काढले.

Published by: News18 Desk
First published: April 16, 2021, 12:09 PM IST

ताज्या बातम्या