• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक कधी जाहीर होणार? वाचा महत्त्वाचे अपडेट

IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक कधी जाहीर होणार? वाचा महत्त्वाचे अपडेट

आयपीएल स्पर्धेचे (IPL 2021) उर्वरित 31 सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार असल्याची घोषणा बीसीसीआयनं यापूर्वीच केली आहे. मात्र या स्पर्धेचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.

 • Share this:
  मुंबई, 28 जून : कोरोना व्हायरसच्या (COVID-19) उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) अचानक स्थगित करावा लागला होता. भारतामध्ये सुरु झालेल्या या सिझनमधील 60 पैकी 29 मॅच झाल्यानंतर आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. चार जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयला ही स्पर्धा तातडीने अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. आयपीएल स्पर्धेचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार असल्याची घोषणा बीसीसीआयनं यापूर्वीच केली आहे. मात्र या स्पर्धेचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. या वेळापत्रकाची क्रिकेट फॅन्सना मोठी प्रतीक्षा आहे. त्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. आयपीएलचे वेळापत्रक आज (28 जून) रोजी जाहीर केले जाईल अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) सुरुवात होणार आहे. हा वर्ल्ड कप देखील यूएईमध्येच होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हे वेळापत्रक तयार करताना वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाचा विचार बीसीसीआयला करावा लागेल. यापूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल स्पर्धेचा उत्तरार्ध 19 सप्टेंबर रोजी सुरु होईल. तर 15 ऑक्टोबर रोजी फायनल होणार आहे. आता टी20 वर्ल्ड कपचा विचार करुन या तारखांमध्ये काही बदल होऊ शकतो. 'तुझा बाप देखील...' पाकिस्तानच्या कोचची खेळाडूला शिवीगाळ जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगच्या आयोजनासाठी बीसीसीआय यूएई सरकारच्या सातत्याने संपर्कात आहे. इंग्लंड सीरिजमध्ये सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंचा थेट बायो-बबलमध्ये समावेश करण्यात यावा अशी बीसीसीआयची मागणी आहे. आयपीएल स्पर्धेत इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळणार नाहीत, अशी घोषणा त्यांच्या बोर्डाने केली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सहभाग देखील अनिश्चित आहे. या दोन क्रिकेट बोर्डाचे मन वळवण्यात बीसीसीआय यशस्वी होते का? याची देखील सर्वांना उत्सुकता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: