Home /News /sport /

IPL 2021: 40 इनिंग आणि 5 वर्षांनतर अखेर मॅक्सवेलनं 'करून दाखवलं'

IPL 2021: 40 इनिंग आणि 5 वर्षांनतर अखेर मॅक्सवेलनं 'करून दाखवलं'

मागील काही आयपीएलमध्ये सातत्यानं फेल गेल्यानं ग्लेन मॅक्सवेलवर (Glenn Maxwell) सातत्यानं टीका होत होती. मॅक्सवेलसाठी विराट कोहलीची (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीम चांगलीच लकी ठरत आहे.

    चेन्नई, 14 एप्रिल :  मागील काही आयपीएलमध्ये सातत्यानं फेल गेल्यानं ग्लेन मॅक्सवेलवर (Glenn Maxwell) सातत्यानं टीका होत होती. मॅक्सवेलसाठी विराट कोहलीची (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीम चांगलीच लकी ठरत आहे. मॅक्सवेलनं या स्पर्धेची सुरुवात चांगली केली आहे. त्यानं बुधवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 41 बॉलमध्ये 59 रन काढले. मॅक्सवेलच्या या खेळामुळेच आरसीबीला हैदराबादच्या टीमविरुद्ध 150 रनचं टार्गेट ठेवता आलं. हैदराबादविरुद्ध मॅक्सवेल सातव्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला होता. तो अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर आऊट झाला. त्यापूर्वी त्यानं 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 59 रन काढले. या अर्धशतकासोबतच मॅक्सवेलनं आयपीएलमधील एक मोठा दुष्काळ संपवला आहे. त्यानं 40 मॅच आणि 5 वर्षांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. विराट कोहली आणि डीव्हिलियर्स आऊट झाल्यानंतर मॅक्सवेलवर मोठी जबाबदारी होती. त्यानं ती जबाबदारी पूर्ण करत शेवटपर्यंत खेळ केला. मॅक्सवेलच्या खेळामुळेच आरसीबीला 150 रनचं टार्गेट हैदराबाद विरुद्ध ठेवता आलं. 1079 दिवसांनी संपवला होता दुष्काळ मॅक्सवेलनं शुक्रवारी आयपीएल  स्पर्धेत तब्बल 1079 दिवसांनी सिक्स लगावला. यापूर्वी त्यानं 27 एप्रिल 2018 रोजी आयपीएलमध्ये शेवटचा सिक्स लगावला होता. त्यानं 2019 च्या आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्याचा मागील सिझन अत्यंत खराब गेला. मागच्या सिझनमधील 13 मॅचमध्ये 106 बॉलमध्ये फक्त 108 रन काढले होते.  मागील संपूर्ण सिझन त्याला एकही सिक्स लगावता आला नाही. अखेर शुक्रवारी 170 बॉल आणि 18 इनिंगनंतर मॅक्सवेलनं सिक्स लगावला आहे. डेव्हिड वॉर्नरची अचूक चाल, फक्त 4 बॉलमध्ये विराटचं 'ट्रम्प कार्ड' फेल मॅक्सवेलनं मुंबई विरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये 2 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 39 रन काढले होते. आता त्यापाठोपाठ हैदराबाद विरुद्ध अर्धशतक झळकवत मॅक्सवेलनं प्रतिस्पर्धी टीमना धोक्याचा इशारा दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Glenn maxwell, IPL 2021, RCB, SRH

    पुढील बातम्या