IPL 2021: पडिक्कलनं मॅच दरम्यान केलेल्या विनंतीला विराटनं दिलं मन जिंकणारं उत्तर

IPL 2021: पडिक्कलनं मॅच दरम्यान केलेल्या विनंतीला विराटनं दिलं मन जिंकणारं उत्तर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) बॅट्समन देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यानं गुरुवारी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध 101 रन काढले.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) बॅट्समन देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal)  यानं गुरुवारी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध 101 रन काढले. त्याच्या शतकामुळे आरसीबनं या सिझनमधील सलग चौथा विजय मिळवला आहे.  या खेळीबद्दल आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं देवदत्तचं कौतुक केलं आहे. देवदत्तनं मागच्या सिझनमध्येही चांगली कामगिरी केल्याची आठवण विराटनं करुन दिली.

विराटनं मॅचनंतर सांगितलं की, "देवदत्त जबरदस्त खेळाडू आहे. मी त्याला 40-50 रन झाल्यानंतर आक्रमक खेळण्याचा सल्ला दिला होता. माझ्या मते टी 20 क्रिकेटमध्ये पार्टरनरशिप महत्त्वाची असते. आम्ही पुढं देखील चांगली कामगिरी करु." विराटंही नाबाद 72 रनची खेळी केली. मात्र विराट सुरुवातीला आक्रमक नव्हता. त्यावेळी देवदत्तनं फटकेबाजी करत वेगानं रन जमवले.

आरसीबीचा कॅप्टन पुढे म्हणाला की, "पडिक्कल शतकाच्या जवळ होता तेंव्हा त्यानं मला फटकेबाजी कर असं सांगितलं होतं. त्यावर तू पहिल्या शतकाच्या जवळ नसतास तर मी हेच केलं असतं, असं उत्तर मी त्याला दिलं.देव प्रमाणेच आमच्या बॉलर्सनी देखील जोरदार कामगिरी केली. आक्रमक बॉलिंग आणि सकारात्मकता आमच्या विजयात निर्णायक ठरली. आमच्या बॉलर्समध्ये एकही मोठं नाव नाही, तरीही आमची बॉलिंग प्रभावी ठरली आहे. टीमनं चारही मॅचमधील डेथ ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग केली. आम्ही 30 ते 35 रन वाचवले आहेत." असं विराटनं सांगितलं.

Vamika ठरतेय विराटसाठी Lucky! अर्धशतकानंतर लाडक्या लेकीची काढली आठवण, VIDEO

शतकापेक्षाही आवश्यक होता...

देवदत्त पडिक्कल या शतकी खेळीमुळे 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराचा मानकरी ठरला. "मी माझ्या बॅटींगची वाट पाहत होतो. मी कोरोना पॉझिटिव्ह झालो तेंव्हापासून मला खेळण्याची इच्छा होती. मी पहिल्या मॅचमध्ये खेळू शकलो नाही, याचं मला वाईट वाटलं. या मॅचमध्ये पिच चांगले होते. आमच्या पार्टनरशिपमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. मला शतकाच्या जवळ पोहचल्यावरही काही दडपण नव्हतं. मी विराटला मॅच संपवण्याची विनंती केली होती. माझ्यासाठी मॅच जिंकणे हे शतकापेक्षा अधिक आवश्यक होते,'' अशी भावना पडिक्कलनं व्यक्त केली.

Published by: News18 Desk
First published: April 23, 2021, 12:12 PM IST

ताज्या बातम्या