• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: Vamika ठरतेय विराटसाठी Lucky! अर्धशतकानंतर लाडक्या लेकीची काढली आठवण, पाहा VIDEO

IPL 2021: Vamika ठरतेय विराटसाठी Lucky! अर्धशतकानंतर लाडक्या लेकीची काढली आठवण, पाहा VIDEO

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जोरदार (RCB) कामगिरी सुरु आहे. या टीमनं सलग चार सामने जिंकत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी धडक मारली आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 एप्रिल : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जोरदार  (RCB) कामगिरी सुरु आहे. या टीमनं सलग चार सामने जिंकत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी धडक मारली आहे. आरसीबीनं गुरुवारी राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 10 विकेट्सनं पराभव केला. देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) नाबाद 101 आणि विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 72 यांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीनं हा विजय मिळवला. विराटचं या सिझनमधील हे पहिलंच अर्धशतक आहे. विराटनं अर्धशतक झळकवताच खास शैलीत सेलिब्रेशन केलं. त्याचबरोबर विराटला त्याची लाडकी लेक वामिकाची (Vamika) आठवण झाली. वामिकाच्या जन्मानंतरची ही पहिलीच आयपीएल स्पर्धा आहे. या स्पर्धेत आरसीबीची आजवर दमदार कामगिरी झाली आहे.टीमची चांगली कामगिरी होत असतानाही विराटही आता फॉर्मात आला आहे. त्यामुळे त्यानं या सिझनमधील पहिलं अर्धशतक वामिकाला अर्पण केलं आहे. आयपीएलनं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विराटनं केलेलं सेलिब्रेशन आहे. विराटनं अर्धशतक झळकानताच आरसीबीच्या डग आऊटच्या दिशेनं बॅट केली. त्याचबरोबर विराटनं हे अर्धशतक वामिकाला अर्पण केलं आहे. आरसीबीनं खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या सिझनमध्ये पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका विराटसोबत आहे. मागच्या आयपीएल सिझनमध्येही अनुष्का विराटसोबत युएईमध्ये उपस्थित होती.
  View this post on Instagram

  A post shared by IPL (@iplt20)

  आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आरसीबीनं  4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. याचसोबत पॉईंट्स टेबलमध्येही ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर राजस्थानची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 4 पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर 3 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. On This Day : IPL मध्ये Gayle Storm, टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड! आता आरसीबीला मुंबईमध्ये फक्त 1 सामना खेळायचा आहे. त्यानंतर ही टीम अहमदाबादला जाईल. अहमदाबादमध्ये चार सामने खेळल्यानंतर आरसीबी शेवटचे पाच सामने कोलकातामध्ये खेळणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: