Home /News /sport /

RCB vs PBKS Dream 11 Prediction: 'हे' 11 खेळाडू ठरतील तुमच्यासाठी गेमचेंजर

RCB vs PBKS Dream 11 Prediction: 'हे' 11 खेळाडू ठरतील तुमच्यासाठी गेमचेंजर

आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) 48 व्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) लढत केएल राहुलच्या पंजाब किंग्जशी (Punjab Kings) होणार आहे.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) 48 व्या मॅचमध्ये  विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) लढत केएल राहुलच्या पंजाब किंग्जशी (Punjab Kings) होणार आहे. रविवारी दुपारी 3.30 वाजता शारजाहमध्ये ही मॅच होणार आहे.या स्पर्धेत आरसीबीनं 11 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 14 पॉईंट्सह ही टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मॅचमध्ये विजय मिळवल्यास आरसीबीचा 'प्ले ऑफ' मधील प्रवेश नक्की होणार आहे. दुसरिकडं पंजाब किंग्जही सध्या 10 पॉईंट्स असलेल्या चार टीमपैकी एक आहे. या सर्व टीममध्ये सध्या चौथ्या क्रमांकासाठी चुरस आहे. पंजाबचे सध्या 10 पॉईंट्स असून ही टीम पाचव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही टीममध्ये आजवर 27 मॅच झाल्या असून त्यापैकी 15 मॅच पंजाबनं तर 12 आरसीबीनं जिंकल्या आहेत. RCB vs PBKS Dream 11 विकेटकिपर - केअएल राहुल बॅटर - विराट कोहली, एडेन मार्करम, शाहरुख खान, देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत ऑलराऊंडर - ग्लेन मॅक्सवेल बॉलर - युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, नॅथन एलिस IPL 2021: ऋतुराजनं शतकापूर्वीच सुरू केले सेलिब्रेशन, सर्वांना झाली नीरज चोप्राची आठवण! पाहा VIDEO संभाव्य टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, डॅन ख्रिस्टीन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, जॉर्ज गार्टन, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज पंजाब किंग्ज : केएल राहुल (कॅप्टन), मयांक अगरवाल, निकोलस पूरन, एडेन मार्करम, दीपक हुडा, शाहरूख खान, फॅबियन एलन, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, अर्शदीप  सिंग आणि रवी बिश्नोई IPL 2021: दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई 'प्ले ऑफ' गाठणार! कोचनी सांगितला फॉर्म्युला
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Punjab kings, RCB

    पुढील बातम्या