IPL 2021: 'या' कारणामुळे झाला KKR मध्ये कोरोनाचा शिरकाव! मॅच स्थगित करण्याची Inside Story

IPL 2021: 'या' कारणामुळे झाला KKR मध्ये कोरोनाचा शिरकाव! मॅच स्थगित करण्याची Inside Story

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात सोमवारी होणारी मॅच अखेर स्थगित करण्यात आली आहे. सर्व खबरदारीनंतही केकेआरच्या टीममध्ये करोना कसा शिरला? असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

  • Share this:

अहमदाबाद, 3 मे : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात सोमवारी होणारी मॅच अखेर स्थगित करण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सोमवारची मॅच पुढं ढकलण्यात आली असून आता त्या मॅचची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

कसा झाला कोरोनाचा शिरकाव?

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) आयपीएल स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडू आणि सदस्यांसाठी खास बायो-बबल तयार केलं आहे. यामधील प्रत्येकांची वारंवार कोरोना चाचणी होते. तसंच त्यांना या बायो-बबलच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही. या सर्व खबरदारीनंतही केकेआरच्या टीममध्ये करोना कसा शिरला? असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

'ईएसपीएन क्रिकइन्फो'नं याबाबत दिलेल्या वृत्तानुसार वरुण चक्रवर्ती काही दिवसांपूर्वी खांद्याचे स्कॅन करण्यासाठी बायो-बबलच्या बाहेर अधिकृत ग्रीन चॅनलमधून गेला होता. त्या ठिकाणी वरुणला कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर केकेआरच्या कॅम्पमध्ये त्याचा शिरकाव झाला, अशी शक्यता आहे.

आयपीएलच्या बायो-बबलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर वरुण आणि संदीप या दोघांनाही इतर खेळाडूंपासून वेगळं करण्यात आलं आहे. केकेआरच्या अन्य खेळाडूंचीही कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्याचे अहवाल देखील लवकरच समोर येतील. त्याचबरोबर गेल्या 48 तासांमध्ये या खेळाडूंच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या देवदत्त पडिक्कल आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेल या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. हे सर्व खेळाडू आता कोरोनामधून बरे झाले असून ते आपल्या टीममध्ये परतले आहेत.

भावाला झाली कोरोनाची लागण, BCCI कडून 2 वर्षांपासून पैसे न मिळाल्यानं खेळाडू हतबल

कोलकाता नाईट रायडर्सची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. त्यांनी सातपैकी 2 मॅच जिंकले असून 5 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे.  आता कोलकाताची पुढील मॅच 8 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अहमदाबादमध्येच होणार आहे.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 1:38 PM IST

ताज्या बातम्या