मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO

IPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) नं जोरदार सुरुवात केली आहे. डीव्हिलियर्स आणि मॅक्सवेल यांच्या खेळीमुळे आरसीबीला सलग तिसरा विजय मिळवता आला. या मॅचच्या दरम्यान मॅक्सवेल डीव्हिलियर्सवर नाराज झाला होता.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 19 एप्रिल:  आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) नं जोरदार सुरुवात केली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच आरसीबीनं पहिल्या तीन मॅच जिंकल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध मिळवलेल्या विजयात एबी डीव्हिलियर्सनं (AB De Villiers) नाबाद 76 रन काढले. त्याच्या आक्रमक खेळीमुळे आरसीबीनं 204 पर्यंत मजल मारली. डीव्हिलियर्सनं ग्लेन मॅक्सवेलसोबत (Glenn Maxwell) महत्त्वपूर्ण पार्टरनरशिप करत टीमला संकटातून बाहेर काढलं आणि या स्पर्धेतील तिसऱ्या विजयाचा पाया रचला.

या मॅचनंचर आरसीबीचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने डीव्हिलियर्सची मुलाखत घेतली. यावेळी चहलनं टीमच्या कामगिरीसोबत मॅक्सवेलसोबत झालेल्या पार्टरनरशिपबद्दलही प्रश्न विचारला. यावेळी डीव्हिलियर्सनं सांगितलं, "मी गेल्या काही महिन्यापासून बरीच मेहनत केली आहे. आरसीबीकडून खेळताना माझा नेहमीच सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. मॅचच्या दरम्यान हवामान आणि परिस्थिती अवघड होती. तरीही आपण मॅच जिंकू शकलो, याचा मला आनंद आहे." असं डीव्हिलियर्सनं सांगितलं.

मॅक्सवेल झाला होता नाराज!

चहलनं यानंतर डिव्हिलियर्सला मॅक्सवेलसंदर्भात प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना डीव्हिलियर्स म्हणाला, "मी बॅटींगला आलो होतो तेंव्हा मॅक्सवेल खूप थकला होता. त्यानं मला सांगितलं की मला रन काढण्यासाठी जास्त पळणं शक्य नाही. तरीही मी त्याला एक किंवा दोन रन काढण्यासाठी खूप पळवलं. त्यामुळे तो माझ्यावर नाराज झाला होता. पण आम्ही टीमच्या विजयात उपयोगी ठरलो याचा आनंद आहे.

शिखर धवननं पंजाबच्या बॉलर्सची केली धुलाई, कोहली-शास्त्रींना दिलं चोख उत्तर

मला मॅक्सवेलसोबत खेळायला मजा येते. तो माझ्यासारखाच खेळतो. आम्ही दोघंही मॅचवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. या मॅचमध्ये देखील आम्ही तेच केलं. आम्ही मैदानात उभं राहिलो आणि चांगली पार्टनरशिप केली तर मोठा स्कोअर उभा करु, हे आम्हाला माहिती होतं. असं डीव्हिलियर्स यावेळी म्हणाला.

First published:

Tags: Cricket, Glenn maxwell, IPL 2021, KKR, RCB, Yuzvendra Chahal