अहमदाबाद, 28 एप्रिल: विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) एक रननं निसटता पराभव केला. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 171 रन केले होते. दिल्लीनं त्याला उत्तर देताना 170 रन केले. ऋषभ पंत (Rishbah Pant) आणि शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) यांच्या अर्धशतकानंतरही दिल्लीचा पराभव झाला. विराटनं या विजयानंतर या मॅचच्या दरम्यान आलेल्या छोट्या वादळाचेही आभार मानले.
विराट कोहलीनं या मॅचनंतर बोलताना सांगितलं की, "पंत आणि हेटमायर यांची बॅटींग पाहून मॅच आमच्या हातामधून निसटली असं वाटत होतं. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजनं विश्वास दिला. आरसीबीनं फिल्डिंगमध्ये चुका केल्या नसत्या तर ही मॅच शेवटपर्यंत चालली नसती. आम्ही काही कॅच सोडले तसंच रन आऊटच्या संधी वाया घालवल्या."
कोहलीनं यावेळी एबी डीव्हिलियर्सची जोरदार प्रशंसा केली. आम्ही विकेट्स गमावल्यानंतर डीव्हिलिर्सनं शेवटच्या ओव्हर्समध्ये चांगली बॅटींग केली, असं त्यानं सांगितलं. तसंच आरसीबीच्या बॉलिंगपूर्वी आलेल्या वादळामुळे रात्र ड्यू नव्हते. त्यामुळे आम्हाला कोरड्या बॉलनं बॉलिंग करायला मिळाली. ज्यामुळे मॅचमध्ये फरक पडला." असं कोहलीनं स्पष्ट केलं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यातल्या सामन्यातली पहिली इनिंग संपल्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) वाळूचं वादळ आलं, त्यामुळे दुसरी इनिंग सुरू व्हायला उशीर झाला. दिल्लीचे ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) मैदानात बॅटिंगसाठी येत होते, पण या वाळूच्या वादळामुळे त्यांना पुन्हा डग आऊटमध्ये जावं लागलं.
दिल्लीच्या पराभवानं इमोशनल झालेल्या पंतला कोहलीनं दिला धीर, पाहा VIDEO
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच वादळामुळे मॅच थांबली होती. या पहिल्यांदा घडलेल्या घटनेमुळेच आरसीबीच्या बॉलर्सलना मदत झाली. त्यामुळे कोहलीनं वादळाचे आभार मानले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Delhi capitals, IPL 2021, RCB, Virat kohli