Home /News /sport /

IPL 2021: RCB च्या 15 कोटींच्या बॉलरनं पहिल्याच मॅचमध्ये तोडली पांड्याची बॅट, VIDEO

IPL 2021: RCB च्या 15 कोटींच्या बॉलरनं पहिल्याच मॅचमध्ये तोडली पांड्याची बॅट, VIDEO

उंचपुऱ्या जेमिसनच्या (Kyle Jamieson) यॉर्करवर फटका मारण्याच्या प्रयत्नात कृणाल पांड्याच्या (Krunal Pandya) बॅटचे दोन तुकडे झाले. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे.

    चेन्नई, 10 एप्रिल : विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमची या आयपीएलमधील (IPL 2021) सुरुवात चांगली झाली आहे. आरसीबीनं पहिल्या मॅचमध्ये बलाढ्य मुंबई इंडियन्सचा (MI) दोन विकेट्सनं पराभव केला. विराटनं या विजयाचं श्रेय सांघिक प्रयत्नांना दिलं आहे. या मॅचमध्ये आरसीबीनं 15 कोटींना खरेदी केलेल्या बॉलरबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. त्यानं या मॅचमध्ये एकच विकेट घेतली. पण त्याच्या भन्नाट यॉर्करनं मुंबई इंडियन्सच्या बॅट्समनच्या बॅटचे दोन तुकडे झाले. आरसीबीनं यावर्षी पहिलं विजेतेपद जिंकण्याच्या उद्देशानं टीममध्ये अनेक बदल केले आहेत. आयपीएलमध्ये सतत फ्लॉप ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) त्यानं मोठी किंमत देऊन खरेदी केलं. त्याचबरोबर भारतामध्ये एकही मॅच न खेळलेल्या न्यूझीलंडच्या काईल जेमिसन ( (Kyle Jamieson) याला तर आरसीबीनं थेट 15 कोटी रुपये मोजून खरेदी केलं आहे. न्यूझीलंडच्या उंचपुऱ्या जेमिसनच्या यॉर्करवर फटका मारण्याच्या प्रयत्नात कृणाल पांड्याच्या (Krunal Pandya)  बॅटचे दोन तुकडे झाले. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. मुंबईच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्या ओव्हरचा तिसरा बॉल जेमिसननं यॉर्कर टाकला. त्याला मारण्याच्या प्रयत्नात कृणालची बॅट तुटली. बॅटचं हँडल फक्त कृणालच्या हातात होतं. अन्य भाग तुटला होता. कृणाललाही हे पाहून धक्का बसला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची  बॅटिंग गडगडली. या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले मुंबईला बॅटिंगला बोलावलं, यानंतर मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 159 रन केले. बँगलोरच्या हर्षल पटेलने  4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 5 विकेट घेतल्या. तर काईल जेमिसन आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. ( अमेरिकेत जाण्याची संधी असूनही निवडलं क्रिकेट, वाचा पहिल्या मॅचच्या हिरोची गोष्ट ) मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेणारा हर्षल पटेल हा पहिलाच बॉलर ठरला आहे. मुंबईकडून या सामन्यात क्रिस लीनने सर्वाधिक 49 रन केले, तर सूर्यकुमार यादवने 31 आणि इशान किशनने 28 रनची खेळी केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Krunal Pandya, Mumbai Indians, RCB

    पुढील बातम्या