Home /News /sport /

IPL 2021: अमेरिकेत जाण्याची संधी असूनही निवडलं क्रिकेट, वाचा पहिल्या मॅचच्या हिरोची गोष्ट

IPL 2021: अमेरिकेत जाण्याची संधी असूनही निवडलं क्रिकेट, वाचा पहिल्या मॅचच्या हिरोची गोष्ट

मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेणारा हर्षल पटेल (Harshal Patel) 14 आयपीएल मोसमांमधला पहिलाच खेळाडू ठरला आहे. हर्षलचा इथवरचा प्रवास खूप कमी लोकांना माहिती आहे.

    चेन्नई, 10 एप्रिल :  मोठ्या स्कोअरकडे वाटचाल करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इनिंगला ब्रेक हर्षल पटेलनं (Harshal Patel) लावला. या सिझनमध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या हर्षलनं 27 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या. त्यानं T20 करियरमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. हर्षल पटेलचा इथवरचा प्रवास खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याला 2005 साली परिवारातील अन्य सदस्यांसोबत अमेरिकेत जाण्याची संधी होती. मात्र क्रिकेटमध्ये करियर बनवण्यासाठी त्यानं भारतामध्येच राहण्याचा निर्णय घेतला. हर्षलचा भाऊ तपन पटेलनं त्याला साथ दिली. हर्षलनं ज्यूनियर क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2008-09 साली अंडर-19 विनू मंकड ट्रॉफीमध्ये त्यानं 23 विकेट्स घेतल्या होत्या. हर्षल 2010 साली झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सदस्य होता. तो गुजरातकडून सीनियर गटामध्ये क्रिकेट खेळला आहे. त्यानंतर तो हरयाणाच्या टीममध्ये गेला.  2011-12 साली त्यानं रणजी ट्रॉफीमध्ये क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलमध्ये प्रत्येकी 8 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तो सध्या हरयाणाचा कॅप्टन आहे. हर्षल आजवर पाच आयपीएल सिझन खेळला आहे. हर्षलला सर्वात प्रथम मुंबई इंडियन्सनं करारबद्ध केलं होतं. पण त्याला आरसीबीकडून पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2012 मध्ये तो आरसीबीकडून खेळला. त्या सिझनमध्ये त्यानं 12 मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएल 2013 मध्ये त्याला एकही मॅचमध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर 2014 साली त्यानं 3 मॅचमध्ये 4 विकेट्स घेतल्या. हर्षलला 2015 चा सिझन सर्वात चांगला गेला. त्या सिझनमध्ये त्यानं 15 मॅचमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. हर्षलला मागच्या सिझनमध्ये फक्त 5 मॅच खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्यानं 3 विकेट्स घेतल्या. या सिझनपूर्वी त्याला आरसीबीनं दिल्लीकडून खरेदी केलं होतं. हर्षललं आजवर आयपीएल कारकीर्दीमध्ये 49 मॅचमध्ये 51 विकेट्स घेतल्या असून 132 रन काढले आहेत. शुक्रवारी झालेली आयपीएल 2021 (IPL 2021) सिझनमधील पहिली मॅच हर्षलसाठी सर्वात खास ठरली. मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेणारा हर्षल पटेल 14 आयपीएल मोसमांमधला पहिलाच खेळाडू ठरला आहे. हर्षल पटेलने हार्दिक पांड्याची पहिली विकेट घेतली, तेव्हा मुंबईचा स्कोअर 135 रन होता. यानंतर इशान किशनलाही हर्षलने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इशान किशनच्या विकेटनंतर मुंबईचा रन करण्याचा वेग मंदावला. (IPL 2021: मॅक्सवेलनं संपवला 1079 दिवसांचा दुष्काळ, विराटला बसला धक्का!) हर्षलने इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड आणि मार्को जेनसन यांची विकेट घेतली. आयपीएलच्या या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात हर्षलने चमकदार कामगिरी केली. हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 5 विकेट घेतल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Haryana, IPL 2021, Mumbai Indians, RCB

    पुढील बातम्या