अहमदाबाद, 1 मे : बीसीसीआयनं केलेल्या कंत्राटामध्ये खालचा ग्रेड मिळालेला टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचा या आयपीएलमधील फॉर्म खराब आहे. चहलनं या आयपील सिझनमध्ये (IPL 2021) सात मॅचमध्ये 8.26 च्या इकॉनॉमी रेटनं फक्त 4 विकेट्स घेतल्या आहेत.
अहमदाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये हरप्रीत बरार (Harpreet Brar) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या स्पिन बॉलर्सच्या भेदक माऱ्यामुळे पंजाब किंग्जनं (PBKS) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) 34 रननं पराभव केला. हरप्रीतनं 4 ओव्हर्समध्ये 19 रन देत 3 विकेट्स घेतल्या. तर बिश्नोईनं 17 रन देत 2 विकेट्स घेऊन त्याला उत्तम साथ दिली. पंजाबच्या स्पिनर्सनी कमाल केली. त्याचवेळी आरसीबीच्या चहलला 4 ओव्हर्समध्ये 34 रन देऊन फक्त 1 विकेट मिळाली. आरसीबीचा मुख्य स्पिनर असलेल्या चहलला या सिझनमध्ये त्याच्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण करता आलेली नाही.
आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटीच (Simon Katich) यांनी मॅचनंतर बोलताना चहलच्या कामगिरीबद्दल मत व्यक्त केलं आहे. " चहलची जागा धोक्यात आहे, असं मला वाटत नाही. त्यानं या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली. पिच नंतर अधिक स्लो झाले. पंजाबच्या बॉलर्सनी पिचचा योग्य वापर केला '' या शब्दात कॅटीच यांनी चहलचा बचाव केला.
IPL 2021: डीव्हिलियर्सला जाळ्यात कसं अडकवलं? पंजाबच्या बॉलरनं केला खुलासा
"चहलनं पहिल्या ओव्हरनंतर चांगलं कमबॅक केलं. पहिली ओव्हरमध्ये भरपूर रन दिल्यानंतर कमबॅक करणं सोपं नसतं. आमच्यासाठी हा दिवस निराशाजनक होता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पुढची मॅच होणार आहे. या मॅचमध्ये परिस्थिती बदलेल. आमची टीम कमबॅक करेल." असा विश्वास कॅटीच यांनी व्यक्त केला. आरसीबीची पुढील मॅच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सोमवारी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Punjab kings, RCB, Yuzvendra Chahal