मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: विराट कोहलीचं डावपेच अंगलट, विश्वासू खेळाडूनी केली निराशा

IPL 2021: विराट कोहलीचं डावपेच अंगलट, विश्वासू खेळाडूनी केली निराशा

 वरुण चक्रवर्तीच्या भेदक माऱ्यापुढे रॉयल चॅलेंजर्सचा संघ्या अवघ्या 92 धावांवर गारद झाला आहे.

वरुण चक्रवर्तीच्या भेदक माऱ्यापुढे रॉयल चॅलेंजर्सचा संघ्या अवघ्या 92 धावांवर गारद झाला आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेच्या 10 मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) एक आश्चर्यकारक निर्णय घेतला.

चेन्नई, 18 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेच्या 10 मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. या आयपीएल (IPL 2021) सिझनमध्ये  3 विदेशी खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये खेळवणारा विराट पहिलाच कॅप्टन बनला आहे.

चेन्नईच्या स्लो पिचचा विचार करुन विराटनं ऑलराऊंडर डॅन ख्रिस्टियनला (Dan Christian) टीममधून वगळलं आणि त्याच्या जागी रजत पाटीदार (Rajat Patidar) या तरुण बॅट्समनचा समावेश केला. ख्रिस्टियनला या सिझनमध्ये आरसीबीनं 4.8 कोटींना खरेदी केलं होतं. तर रजत पाटीदारला 20 लाखांमध्येच आरसीबीनं करारबद्ध केलं आहे.

विराटची निराशा

विराट कोहलीनं मोठ्या अपेक्षेनं या सामन्यात खेळवलेल्या रजत पाटीदारनं कॅप्टनची निराशा केली. दुसऱ्या ओव्हरमध्येच विराट आऊट झाल्यानं रजत पाटीदारला तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीनं बॅटींगला पाठवलं. स्पिन बॉलिंग खेळण्यात रजत एक्स्पर्ट मानला जातो. विराट कोहलीनं देखील टॉसच्या वेळी याच गोष्टीचा उल्लेख केला होता. देशांतर्गत स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या रजतला मोठ्या अपेक्षेनं विराटनं टीममध्ये समावेश केला होता. इतकंच नाही तर त्याला ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स या दोन दिग्गज बॅट्समनच्या आधी तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला पाठवलं.

रजत पाटीदार फक्त दोन बॉलच टिकला. त्याला वरुण चक्रवर्तीनं फक्त 1 रनवर आऊट करत आरसीबीला दुसरा धक्का दिला. या आयपीएलमधील आरसीबीच्या पहिल्या मॅचमध्येही रजत पाटीदार फक्त 8 रन काढून आऊट झाला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात तो एक अंकी रन काढून आऊट झाला आहे.

IPL 2021: केन विल्यमसन पुढील मॅच खेळणार का? डेव्हिड वॉर्नरनं दिलं उत्तर

टॉस जिंकल्यावर आश्चर्य

विराट कोहलीनं यापूर्वी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. टॉस जिंकलेलं पाहताच विराटला आश्चर्याचा धक्का बसला. याचं कारण म्हणजे केकेआरचा कॅप्टन इयन मॉर्गनच्या विरुद्ध यापूर्वी विराट सलग 7 वेळा टॉस हरला आहे. यापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या  वन-डे आणि 2 टी-20 मालिकेत सलग 7 वेळा टॉस हरला आहे. त्यामुळे यंदा टॉस जिंकताच विराटला आश्चर्याचा धक्का बसला.

बंगळुरुची Playing 11 : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, एबी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल,  शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल

कोलकाताची  Playing 11 : शुभमन गिल, नितिश राणा, राहुल त्रिपाठी आंद्रे रसेल, इयन मॉर्गन, शाकिब-अल-हसन, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती

First published:
top videos

    Tags: IPL 2021, KKR, RCB, Virat kohli