मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : KKR ची खराब कामगिरी सुरूच, RCB अजून अजिंक्यच

IPL 2021 : KKR ची खराब कामगिरी सुरूच, RCB अजून अजिंक्यच

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) खराब कामगिरी सुरूच आहे. बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यात केकेआरचा तब्बल 38 रनने पराभव झाला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) खराब कामगिरी सुरूच आहे. बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यात केकेआरचा तब्बल 38 रनने पराभव झाला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) खराब कामगिरी सुरूच आहे. बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यात केकेआरचा तब्बल 38 रनने पराभव झाला आहे.

चेन्नई, 18 एप्रिल :  आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) खराब कामगिरी सुरूच आहे. बँगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यात केकेआरचा तब्बल 38 रनने पराभव झाला आहे. बँगलोरने ठेवलेल्या 205 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 166 रन केले. आंद्रे रसेल (Andre Russell) याने 20 बॉलमध्ये सर्वाधिक 31 रन केले, तर नितीश राणा 18, शुभमन गिल 21, राहुल त्रिपाठी 25, इयन मॉर्गन 29, शाकीब अल हसन 26 यांना चांगली सुरूवात मिळूनही मोठा स्कोअर करता आला नाही. बँगलोरकडून काईल जेमिसनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेलला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट घेण्यात यश आलं.

एबी डिव्हिलियर्स (Ab de Villiers) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांच्या फटकेबाजीमुळे बँगलोरने कोलकात्याला (RCB vs KKR) विजयासाठी 205 रनचं आव्हान ठेवलं आहे. एबी डिव्हिलियर्सने 34 बॉलमध्ये नाबाद 76 रन आणि ग्लेन मॅक्सवेलने 49 बॉलमध्ये 78 रनची खेळी केली. एबीने 9 फोर आणि 3 सिक्स आणि मॅक्सवेलनेही 9 फोर आणि 3 सिक्स लगावल्या. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

रॉयल चॅलेजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders) यांच्यात रविवारचा पहिला सामना होत आहे. या सामन्यात आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात बँगलोरच्या टीमने एकही सामना गमावलेला नाही. तीन सामन्यांमधल्या तीन विजयांसह आरसीबी पहिल्या क्रमांकावर आहे. तर पहिला सामना जिंकल्यानंतर कोलकात्याने दुसरे दोन्ही सामने गमावले आहेत.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, KKR, RCB, Virat kohli