मुंबई, 28 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनमधील (IPL 2021) अर्धे सामने देखील अजून पूर्ण झालेले नाहीत. सध्या प्रत्येक मॅच नंतर पॉईंट टेबलमध्ये बदल होत आहे. स्पर्धेतील ही चुरस उत्तरार्धात आणखी रंगणार आहे. त्यामुळे 'प्ले ऑफ' मध्ये खेळणाऱ्या चार टीम कोणत्या याचं उत्तर साखळी फेरीतील शेवटच्या मॅचमध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आयपीएल स्पर्धेत विजेता कोण होणार? याचा अंदाज बांधणं अजूनही अवघड आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी याबाबत एक ट्विट केलं असून त्यामध्ये ही स्पर्धा कोण जिंकणार याचा सूचक इशारा दिला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) या मॅचनंतरही शास्त्रींनी हा इशारा दिलाय. अहमदाबादमध्ये मंगळवारी झालेली ही मॅच आरसीबीनं अवघ्या एक रननं जिंकली. एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) एकाकी झुंजार खेळीनंतर बंगळुरुनं दिल्लीला विजयासाठी 172 रनचं आव्हान दिलं होतं. बंगळुरुकडून डीव्हिलियर्सनं सर्वात जास्त रन केले. त्यानं फक्त 42 बॉलमध्ये नाबाद 75 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता.
172 रनचा पाठलाग करताना दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishah Pant) आणि शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) यांनी पाचव्या विकेट्ससाठी 78 रनची नाबाद पार्टनरशिप केली. मात्र त्यांची ही पार्टनरशिप दिल्लीला विजय मिळवून देऊ शकली नाही. दिल्लीला निर्धारीत 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 170 रन केले.
या थरारक लढतीनंतर रवी शास्त्रींनी एक सूचक ट्विट करत नव्या चॅम्पियनबाबत इशारा केला आहे. यंदा कोणती जुनी टीम नाही तर नवी टीम आयपीएल चॅम्पियन होईल. त्याचं बी आता पेरलं गेलं आहे,'' असं ट्विट शास्त्रींनी केलं आहे.
Brilliant game last night. Seeds being sowed for a potentially new winner to emerge #IPL2021 @IPL pic.twitter.com/A0RKnI0y4S
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 28, 2021
चेन्नई- हैदराबादच्या 2 खेळाडूंमध्ये 3D टशन, जुन्या वादाचे उमटणार मैदानात पडसाद
शास्त्रींनी या ट्विटमध्ये कोणत्याही टीमचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा इशारा हा दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन टीमकडं आहे. कारण, त्यांनी या दोन टीमच्या मॅचनंतर हे ट्विट केलं असून त्या टीमच्या कॅप्टनचा फोटो देखील वापरला आहे. आता रवी शास्त्रींची ही भविष्यवाणी खरी होणार का? हे 30 मे रोजी समजेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Delhi capitals, IPL 2021, Ravi shashtri, RCB