Home /News /sport /

IPL 2021: यशस्वी जयस्वालला मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं खास गिफ्ट, पाहा Photo

IPL 2021: यशस्वी जयस्वालला मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं खास गिफ्ट, पाहा Photo

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ओपनिंग बॅट्समन यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला आयुष्यभर लक्षात राहील असं एक खास गिफ्ट या स्पर्धेमध्ये मिळालं आहे.

    नवी दिल्ली, 3 मे: आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोना व्हायरसमुळे स्थगित करावी लागली. आता सर्व खेळाडू घरी परतत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक तरुण भारतीय खेळाडूंना जगातील दिग्गज क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्याचा अनुभव मिळतो. त्यांचं या क्रिकेटपटूंशी खास नातं देखील तयार होतं. राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ओपनिंग बॅट्समन यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला आयुष्यभर लक्षात राहील असं एक खास गिफ्ट या स्पर्धेमध्ये मिळालं आहे. राजस्थान रॉयल्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि त्याचा ओपनिंग पार्टनर जोस बटल (Jos Buttler) यांचा हा फोटो आहे. बटलरनं जयस्वालला त्याची बॅट सहीसह भेट दिली आहे.(Jos Buttler gifts his bat to Yashasvi Jaiswal )राजस्थान रॉयल्सनं या फोटोला 'स्पेशल ओपनिंग पार्टनरकडून भेट' असं कॅप्शन दिलं आहे. जयस्वालला भेट दिलेल्या बॅटवर बटलरनं खास मेसेज देखील दिला आहे. "तुझ्यातील टॅलेंटचा फायदा घे. माझ्या  शुभेच्छा सोबत आहेत," या शब्दात बटलरनं त्याच्या टीममधील खेळाडूचा उत्साह वाढवला आहे. ( वाचा : काहे दिया 'कमेंट', सायलीच्या फोटोवर ऋतुराज घायाळ, चर्चा तर होणारच! ) मुंबईकर यशस्वी जयस्वाल 2020 मध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमुळे प्रसिद्धीस आला. त्याला मागच्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सनं करारबद्ध केलं. जयस्वालला या सिझनमध्ये सुरुवातीला संधी मिळाली नाही. पहिल्या चार मॅचनंतर त्याला संधी मिळाली. त्यानं 3 इनिंगमध्ये 132 च्या स्ट्राईक रेटनं 66 रन केले. 32 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, Photo, Rajasthan Royals, Sports

    पुढील बातम्या