Home /News /sport /

IPL 2021: अंपायरच्या 2 चुकांमुळे झाला पंजाबचा पराभव! धक्कादायक सत्य उघड

IPL 2021: अंपायरच्या 2 चुकांमुळे झाला पंजाबचा पराभव! धक्कादायक सत्य उघड

कार्तिक त्यागीच्या (Kartik Tyagi) शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचचं चित्र बदललं. पण 19 व्या ओव्हरमध्ये अंपायर्सनं केलेल्या चुकांचाही पंजाबच्या (Punjab Kings) पराभवात वाटा आहे.

    दुबई, 22 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मधील मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पंजाब किंग्सचा (Punjab kings) 2 रननं पराभव केला. राजस्थाननं पहिल्यांदा बॅटींग करत पंजाबसमोर विजयासाठी 186 रनचं लक्ष्य ठेवलं होतं. त्याला उत्तर देताना पंजाबची टीम निर्धारित ओव्हर्समध्ये 183 रनच करु शकली. शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी 4 रनची आवश्यकता होती आणि त्यांच्या 8 विकेट्स शिल्लक होत्या. पण, कार्तिक त्यागीनं (Kartik Tyagi) शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे पंजाबनं 2 रननं मॅच गमावली. कार्तिक त्यागीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचचं चित्र बदललं. पण 19 व्या ओव्हरमध्ये अंपायर्सनं केलेल्या चुकांचाही पंजाबच्या पराभवात वाटा आहे. 19 व्या ओव्हरमध्ये राजस्थानच्या मुस्तफिजूर रहमाननं 2 नो बॉल टाकले. त्याकडं फिल्ड अंपायर आणि थर्ड अंपायर या दोघांनीही दुर्लक्ष केलं. ही मॅच संपताच सोशल मीडियावर या विषयावर वादळ उठलं. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा यानं रहमाननं शेवटच्या ओव्हरमध्ये 2 नो बॉल टाकले होते, पण अंपायरनं ते दिले नाहीत, हा मुद्दा उपस्थित केला. तर इराफान पठाणनंही या चुकीवर नाराजी व्यक्त केली. 'पराभव पचवणे अवघड' 19 ओव्हर मॅचवर वर्चस्व गाजवल्यानंतर पंजाबचा शेवटच्या ओव्हरमध्ये धक्कादायक पराभव झाला. या पराभवानंतर पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) चांगलाच निराश झाला आहे. T20 वर्ल्ड कपसाठी निवड समितीचं दुर्लक्ष, भारतीय बॅट्समननं दिलं चोख उत्तर 'आम्हाला दबावात चांगला खेळ करणे आवश्यक होते. हा पराभव पचवणे अवघड आहे. कारण, आम्ही मागील चुकांमधून धडा शिकलेलो नाही. आम्ही पहिल्या 6 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती पण दुर्दैवानं बॉल बॅटला लागल्यानंतर फिल्डर्सच्या हातामध्ये आला नाही. आम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलं होतं.' असं राहुलनं सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Punjab kings, Rajasthan Royals

    पुढील बातम्या