• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: 6 बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, कार्तिकच्या ओव्हरमध्ये दिग्गज झाले निरुत्तर

IPL 2021: 6 बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, कार्तिकच्या ओव्हरमध्ये दिग्गज झाले निरुत्तर

राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) कार्तिक त्यागीनं (Kartik Tyagi) टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमुळे राजस्थाननं पंजाबवर (Rajasthan Royals vs Punjab Kings) 2 रननं विजय मिळवला.

 • Share this:
  दुबई, 22 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) कार्तिक त्यागीनं (Kartik Tyagi) टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमुळे राजस्थाननं पंजाबवर (Rajasthan Royals vs Punjab Kings) 2 रननं विजय मिळवला. पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 4 रन हवे होते, आणि त्यांच्या 8 विकेट्स शिल्लक होत्या. त्यावेळी फक्त 12 वा टी20  सामना खेळणाऱ्या कार्तिकनं 1 रन देत राजस्थानला विजय मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं? उत्तर प्रदेशच्या 20 वर्षांच्या कार्तिक त्यागीनं 20 व्या ओव्हरचा पहिला बॉल फुलटॉस टाकला. त्यावर एडेन मार्करमला एकही रन काढता आला नाही. त्यानं दुसरा बॉल जवळपास यॉर्कर टाकला होता. त्यावर मार्करमनं एक रन काढला. त्यागीनं तिसरा बॉल वाईड यॉर्कर टाकला. त्यावर पूरन कट मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. विकेट किपर संजू सॅमसन (Sanju Samson) यानं त्याचा कॅच घेतला. आता पंजाबला मॅच जिंकण्यासाठी 3 बॉलमध्ये 3 रन हवे होते. यशस्वीची बेस्ट खेळी, अर्शदीपच्या 5 विकेट, पहिले तीन दिवस युवा खेळाडूंचाच धमाका! कार्तिकनं चौथा बॉल फुल वाईड टाकला. तो बॉल स्टंपच्या बराच बाहेर होता. पण दीपक हुडानं बाहेर जात बॉल मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंपायरनं तो बॉल वाईड दिला नाही. पाचवा बॉल देखील त्यागीनं तसाच टाकला. तो बॉल हुडाच्या बॅटला लागून सॅमसनच्या हातामध्ये विसावला. आता पंजाबला विजयासाठी 1 बॉलमध्ये 3 रन हवे होते. कार्तिकनं सहावा आणि मॅचमधील शेवटचा बॉल देखील फुल वाईड टाकला. फेबियन एलेनला त्यावर रन काढता आला नाही. त्यामुळे राजस्थाननं एक गमावलेला सामना जिंकला. त्यागीनं 4 ओव्हरमध्ये 29 रन देत 2 विकेट्स घेतल्या. त्यानं पहिल्या 3 ओव्हरमध्ये 28 रन दिले होते आणि त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं फक्त 1 रन देत 2 विकेट्स घेतल्या. IPL 2021 : पंजाबने गमावला हातातला सामना, राजस्थानचा रोमांचक विजय मुनाफ पटेलची केली बरोबरी कार्तिकनं शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वात कमी रन वाचवण्याच्या मुनाफ पटेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मुनाफनं 2009 साली राजस्थानकडूनच खेळताना मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध 4 रन वाचवले होते. पण तोपर्यंत मुंबईच्या 7 विकेट्स पडल्या होत्या. त्यावेळी मुंबईला फक्त 1 रनच काढता आला. तर उर्वरित 3 बॅट्समन आऊट झाले. त्यापैकी 2 रन आऊट झाले होते
  Published by:News18 Desk
  First published: