• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: राजस्थानच्या विजयाचं 'ऑस्ट्रेलिया कनेक्शन', शेवटच्या ओव्हरचं उघड झालं रहस्य

IPL 2021: राजस्थानच्या विजयाचं 'ऑस्ट्रेलिया कनेक्शन', शेवटच्या ओव्हरचं उघड झालं रहस्य

राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) 2 रननं विजय मिळाला. पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 4 रन हवे होते, आणि त्यांचे 8 बॅट्समन मैदानात होते. त्यावेळी कार्तिकनं (Kartik Tyagi) फक्त 1 रन देत 2 विकेट्स घेतल्या आणि राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर : पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये कार्तिक त्यागी (Kartik Tyagi)  हिरो ठरला. त्याच्या शेवटच्या ओव्हरमुळे राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) 2 रननं विजय मिळाला. पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 4 रन हवे होते, आणि त्यांचे 8 बॅट्समन मैदानात होते. त्यावेळी कार्तिकनं फक्त 1 रन देत 2 विकेट्स घेतल्या आणि राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलिया कनेक्शन राजस्थानच्या विजयानंतर कार्तिक चांगलाच खूश आहे. कार्तिकनं या यशाचं रहस्य ऑस्ट्रेलिया दौऱ्याला दिलं आहे. कार्तिकची ऑस्ट्र्लिया दौऱ्यासाठी टीम इंडियात नेट बॉलर म्हणून निवड झाली होती. मॅच संपल्यानंतर कार्तिकनं सांगितलं की, 'ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मला काही सिनिअर्सनी साांगितलं की मी बॉल थोडा मागं टाकत आहे. त्यानंतर मी बॉल पुढं टाकण्यास सुरूवात केली. या बदलामुळे मला विकेट्स मिळू लागले. शॉर्ट बॉलची चूक मी देशांतर्गत क्रिकेटमध्येही करत होतो,'असं कार्तिकनं सांगितलं. RESULT DATA: कशी झाली शेवटची ओव्हर उत्तर प्रदेशच्या 20 वर्षांच्या कार्तिक त्यागीनं 20 व्या ओव्हरचा पहिला बॉल फुलटॉस टाकला. त्यावर एडेन मार्करमला एकही रन काढता आला नाही. त्यानं दुसरा बॉल जवळपास यॉर्कर टाकला होता. त्यावर मार्करमनं एक रन काढला. त्यागीनं तिसरा बॉल वाईड यॉर्कर टाकला. त्यावर पूरन कट मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. विकेट किपर संजू सॅमसन (Sanju Samson) यानं त्याचा कॅच घेतला. आता पंजाबला मॅच जिंकण्यासाठी 3 बॉलमध्ये 3 रन हवे होते. IPL 2021: अंपायरच्या 2 चुकांमुळे झाला पंजाबचा पराभव! धक्कादायक सत्य उघड कार्तिकनं चौथा बॉल फुल वाईड टाकला. तो बॉल स्टंपच्या बराच बाहेर होता. पण दीपक हुडानं बाहेर जात बॉल मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंपायरनं तो बॉल वाईड दिला नाही. पाचवा बॉल देखील त्यागीनं तसाच टाकला. तो बॉल हुडाच्या बॅटला लागून सॅमसनच्या हातामध्ये विसावला. आता पंजाबला विजयासाठी 1 बॉलमध्ये 3 रन हवे होते. कार्तिकनं सहावा आणि मॅचमधील शेवटचा बॉल देखील फुल वाईड टाकला. फेबियन एलेनला त्यावर रन काढता आला नाही. त्यामुळे राजस्थाननं एक गमावलेला सामना जिंकला.
  Published by:News18 Desk
  First published: