IPL 2021: संजू सॅमसननं टॉस जिंकला, 'ही' आहे दोन्ही टीमची Playing 11

IPL 2021: संजू सॅमसननं टॉस जिंकला, 'ही' आहे दोन्ही टीमची Playing 11

इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) मधील 7 व्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सची लढत राजस्थान रॉयल्सशी (Delhi Capitals vs Rajasthan Royals) होत आहे. दोन्ही टीमनं टीममध्ये दोन बदल केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) मधील 7 व्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सची लढत राजस्थान रॉयल्सशी (Delhi Capitals vs Rajasthan Royals) होत आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पहिली मॅच अगदी एकतर्फी जिंकली होती. तर राजस्थानच्या टीमला पंजाब किंग्जकडून पराभव सहन करावा लागला होता. दोन्ही टीम्सच्या बॅट्समननी पहिल्या लढतीत जोरदार बॅटिंग केली होती.

विशेष म्हणजे या हंगामात पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणारे विकेटकिपर-बॅट्समन ऋषभ पंत (दिल्ली) आणि संजू सॅमसन (राजस्थान) या मॅचमध्ये आमने-सामने आहेत. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसननं टॉस जिंकला असून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.  राजस्थानचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्याच्या जागी डेव्हिड मिलरला(David Miller) संधी मिळाली आहे. तर श्रेयस गोपाळच्या जागी जयदेव उनाडकतचा समावेश करण्यात आला आहे. तर दिल्लीच्या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अमित मिश्राच्या जागी ललित यादवला (Lalit Yadav) संधी मिळाली आहे . ललितची ही पहिलीच आयपीएल मॅच आहे.

राजस्थानच्या फलंदाजांना स्वैर फटकेबाजी करू न देता जखडून ठेवण्याची जबाबदारी दिल्लीच्या आवेश खान आणि ख्रिस वोक्सवर असेल. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र, राजस्थानकडे देखील चांगल्या फलंदाजांचा भरणा असल्याने त्यांना रोखण्याचे आव्हान या दोघांवर असेल.

तर राजस्थानच्या बॉलर्ससमोर पहिल्या मॅचमधील खराब कामगिरी विसरुन कमबॅक करण्याचं आव्हान आहे. आयपीएल लिलावातील सर्वात महागडा बॉलर ख्रिस मॉरीसकडं राजस्थानच्या बॉलिंगचं नेतृत्त्व आहे. दिल्लीच्या टीममध्ये अनेक आक्रमक बॅट्समनचा समावेश असून त्यांना रोखण्यासाठी संजू सॅमसन काय डावपेच वापरणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

दिल्ली कॅपिटल्सची Playing 11 : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, मार्कस स्टॉईनिस, ललित यादव ख्रिस वोक्स, आर. अश्विन, टॉम करन, कागिसो रबाडा आणि आवेश खान

राजस्थान रॉयल्सची Playing 11 : जोस बटलर, मनन व्होरा, संजू सॅमसन, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवातिया, शिवम दुबे, ख्रिस मॉरीस, जयदेव उनाडकत,  मुस्तफिजूर रहेमान आणि चेतन सकारिया

Published by: News18 Desk
First published: April 15, 2021, 7:07 PM IST

ताज्या बातम्या