मुंबई, 29 एप्रिल : सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोनामुळे रोज हजारो लोकांता मृत्यू होत आहे. कोरोनाविरुद्ध लढाईमध्ये जगभरातून भारताला मदत मिळत आहे. आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) कोरनो विरुद्धच्या लढाईसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. रॉयल्सनं या लढाईसाठी 7.5 कोटींची मदत देण्याची घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्सनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.
" राजस्थान रॉयल्सकडून Covid-19 ने प्रभावित झालेल्या लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी मालक, खेळाडू आणि मॅनेजमेंटच्या मार्फत 1 मिलियन डॉलर म्हणजेच 7.5 कोटींची मदत जााहीर केली आहे. ही मदत राजस्थान रॉयल्स फाऊंडेश आणि ब्रिटीश एशियन ट्रस्टकडून देण्यात येईल. या कसोटीच्या प्रसंगी राजस्थान टीममधील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ भारतासोबत आहेत.''
Rajasthan Royals announce a contribution of over $1 milion from their owners, players and management to help with immediate support to those impacted by COVID-19. This will be implemented through @RoyalRajasthanF and @britishasiantst.
Complete details 👇#RoyalsFamily — Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2021
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केली मदत
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett Lee) देखील भारताच्या मदतीसाठी धावला आहे. ब्रेट लीने भारतातल्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 1 बिटकॉईन म्हणजेच जवळपास 42 लाख रुपये दिले आहेत. याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू पॅट कमिन्सने ऑक्सिजन पुरवठ्यासाठीच 50 हजार डॉलर म्हणजे जवळपास 37 लाख रुपये पीएम केयर्स फंडसाठी दिले आहेत. कमिन्सने यासोबतच सहकारी खेळाडूंनाही मदत करण्याचं आवाहन केलं होतं.
मुंबई विरुद्धच्या मॅचपूर्वी राजस्थनाला दिलासा, संजूला मिळाला नवा आधार
'भारत माझं दुसरं घर आहे. क्रिकेट खेळत असताना मला इथल्या लोकांकडून जे प्रेम मिळालं, ते निवृत्तीनंतरही कायम आहे. भारतीयांसाठी माझ्या मनात खास स्थान आहे. या संकटकाळात लोकांचा मृत्यू होताना बघणं हृदयद्रावक आहे. भारतीयांची मदत करण्यासाठी थोडं योगदान करण्याची संधी मला मिळाली, त्याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी www.cyptorelief.in ला एक बिटकॉईन दान करत आहे, यातून भारतातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जाईल,' असं ब्रेट ली म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, IPL 2021, Rajasthan Royals