कोरोनाग्रस्त वडिलांना बरं करण्यासाठी 'हा' खेळाडू IPL ची सर्व कमाई देण्यास तयार

कोरोनाग्रस्त वडिलांना बरं करण्यासाठी 'हा' खेळाडू IPL ची सर्व कमाई देण्यास तयार

आयपीएल (IPL 2021) स्थगित होताच राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakariya) त्याचा बहुतेक वेळ हॉस्पिटलमध्ये घालवत आहे.

  • Share this:

भावनगर (गुजरात), 7 मे: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा हा सिझन (IPL 2021) स्थगित झालाय. बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल स्थगित होताच राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फास्ट बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakariya) त्याचा बहुतेक वेळ हॉस्पिटलमध्ये घालवत आहे. सकारियाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या भावनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

चेतन सकारियानं याबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, " राजस्थान रॉयल्सकडून मला काही दिवसांपूर्वीच पैसे मिळाले आहेत, हे माझं भाग्य आहे. मी ते पैसे घरी ट्रान्सफर केले आहेत. सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये याचा उपयोग होईल." वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचं सकारियाला मागच्या आठवड्यामध्येच समजले होते.

सकारियानं वडिलांच्या उपचारासाठी आयपीएलमधील सर्व कमाई खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. त्याला या सिझनमध्ये 1.2 कोटी रुपयांमध्ये राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं आहे.

IPL मुळे आयुष्य बदललं

"मी माझ्या वडिलांच्या चांगल्या उपचारासाठी क्रिकेट आणि IPL मधून मि्ळालेले पैसे देत आहे. ही स्पर्धा 1 महिना झाली नसती तर माझ्यासाठी खूप अवघड परिस्थिती होती. मी गरीब कुटुंबाचा सदस्य आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर टेंपो चालवला आहे. IPL मुळेच आमचं आयुष्य बदललं आहे," असं सकारियानं यावेळी सांगितलं.

भारतीय क्रिकेटपटूच्या घरी कोरोनाचा कहर! आईनंतर बहिणीचंही निधन

चेतन सकारियानं या आयपीएलमधील 7 मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं पहिल्याच मॅचमध्ये 3 विकेट्स घेत जोरदार पदार्पण केलं होतं. त्यानं या स्पर्धेत केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना या सारख्या दिग्गज बॅट्समन्सना आऊट केलं आहे.

जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्यापर्यंतच्या सकारियाच्या प्रवासात अनेक अडथळे आले. 22 वर्षांचा डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या सकारियाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वडील टेम्पो ड्रायव्हरची नोकरी करत होते. घरात आर्थिक चणचण असताना क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करणं शक्यच नव्हतं, म्हणून त्याने बूक स्टॉलवर दोन वर्ष रोजंदारीवर काम केलं. सकारियाचा आयडल युवराज सिंग (Yuvraj Singh) 2011 मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकवून देत होता, पण हा इतिहास बघण्यासाठी त्याच्या घरात टीव्हीदेखील नव्हता.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 3:26 PM IST

ताज्या बातम्या