• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: पंजाबला पराभूत केल्यानंतरही संजू समॅसनला धक्का, राजस्थान रॉयल्स अडचणीत

IPL 2021: पंजाबला पराभूत केल्यानंतरही संजू समॅसनला धक्का, राजस्थान रॉयल्स अडचणीत

पंजाबवरील (Punjab Kings) या महत्त्वाच्या विजयानंतरही राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) एक चूक झाली. त्याची किंमत कॅप्टन संजू सॅमसनला (Sanju Samson) चुकवावी लागली.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्सनं विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs Punjab Kings) ही मंगळवारी झालेली मॅच चांगलीच रोमांचक झाली. या मॅचमध्ये राजस्थानचा फास्ट बॉलर कार्तिक त्यागीनं (Kartik Tyagi) शेवटच्या ओव्हरमध्ये 4 रन वाचवले. पंजाबविरुद्धच्या या विजयासह राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पंजाबवरील या महत्त्वाच्या विजयानंतरही राजस्थान रॉयल्सची एक चूक झाली. त्याची किंमत कॅप्टन संजू सॅमसनला चुकवावी लागली. राजस्थान रॉयल्सनं या मॅचमध्ये संथ गतीनं बॉलिंग केली. त्यामुळे सॅमसनला आर्थिक दंड बसला आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं ही माहिती दिली आहे. राजस्थान रॉयल्सची ही पहिलीच चूक असल्यानं कॅप्टन संजू सॅमसनला 12 लाखांचा आर्थिक दंड बसला आहे. सॅमसन चौथा कॅप्टन आयपीएलच्या नियमांनुसार प्रत्येक टीमला निर्धारित वेळेमध्येच 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागतात, पण चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. चेन्नई (CSK), मुंबई (Mumbai Indians) आणि कोलकात्याने (KKR) वेळेमध्ये त्यांच्या 20 ओव्हर पूर्ण न केल्यामुळे या तिन्ही टीमच्या कर्णधारांना 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. आता या यादीमधील चौथा कॅप्टन म्हणून सॅमसनची भर पडली आहे. IPL 2021: पंजाबच्या धक्कादायक पराभवानंतर कॅप्टन राहुल नाराज, टीमच्या कामगिरीवर म्हणाला... निलंबनाची टांगती तलवार आता या मोसमात दुसऱ्यांदा टीमना मर्यादित वेळेत त्यांच्या ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत, तर कॅप्टनला 30 लाख रुपयांचा दंड तसंच खेळाडूंना मॅच फीच्या 25 टक्के दंड भरावा लागेल. तसंच तिसऱ्यांदा जर पुन्हा हीच चूक झाली तर कर्णधाराचं एका सामन्यासाठी निलंबन होईल, सोबतच त्याच्या मानधनातले 30 लाख रुपये दंड म्हणून भरावे लागतील. IPL 2021: राजस्थानच्या विजयाचं 'ऑस्ट्रेलिया कनेक्शन', शेवटच्या ओव्हरचं उघड झालं रहस्य प्रत्येक टीमला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं अपेक्षित आहे. यापूर्वी 90 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू करावी असा नियम होता, पण आता निर्धारित दीड तासाच्या आत 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागणार आहेत. शिवाय या 90 मिनिटांत टीमला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक टीमला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर टाकणं अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक टीमला एका तासामध्ये 14.1 ओव्हर टाकावी लागेल.
  Published by:News18 Desk
  First published: