Home /News /sport /

IPL 2021, KKR vs DC: आंद्रे रसेल टीममध्ये परतणार का? वाचा KKR ची संभाव्य Playing11

IPL 2021, KKR vs DC: आंद्रे रसेल टीममध्ये परतणार का? वाचा KKR ची संभाव्य Playing11

आयपीएल स्पर्धेचं तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर (Kolkata Knight Riders) आता दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) कडवं आव्हान आहे. या मॅचमध्ये आंद्रे रसेल खेळणार का? याकडं सर्वांचं लक्ष आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेचं तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर (Kolkata Knight Riders) आता दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) कडवं आव्हान आहे. या मॅचमधील पराभूत टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. तर विजयी टीम फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध  खेळेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) फायनलमध्ये पराभूत केल्यानंतर केकेआरचा आत्मिश्वास वाढला आहे. त्याशिवाय यूएई लेगमध्ये केकेआरनं दिल्लीचा पराभव केला आहे. शारजाहमधील स्पिनला मदत करणाऱ्या पिचवर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीन समोर दिल्लीच्या बॅटर्सची चांगलीच परीक्षा होणार आहे. केकेआरचे बॉलर्स सध्या फॉर्मात आहेत. पण बॅटींगमध्ये ही टीम टॉप ऑर्डरवर अधिक अवलंबून आहे. दिल्ली विरुद्धच्या मोठ्या लढतीमध्ये कॅप्टन इयन मॉर्गनची बॅट चालावी अशी केकेआरला अपेक्षा असेल. या मॅचमध्ये कोणते 11 जण खेळतील हे पाहूया ओपनर्स: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल जोडीनं चांगली सुरुवात केली आहे. अय्यरनं यूएई लेगमध्ये पदार्पण केले. त्यानं 8 मॅचमध्ये दोन अर्धशतकांच्या जोरावर 265 रन काढले आहेत. तर पहिल्या टप्प्यात अपयशी ठरलेल्या गिलनं यूएईमध्ये पुनरागमन केलं आहे. त्यानं मागील तीन मॅचमध्ये दोन अर्धशतक झळकावली आहेत. आरसीबीविरुद्ध एलिमिनेटर मॅचमध्ये या जोडीनं 41 रनची महत्त्वाची पार्टनरशिप केली होती. KKR vs DC, Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य मिडल ऑर्डर : राहुल त्रिपाठी आणि नितिश राणा यांनी आत्तापर्यंत केकेआरसाठी चांगली कामगिरी केली आहे. या सीरिजमध्ये राहुल त्रिपाठीनं केकेआरसाठी सर्वात जास्त 383 रन केले आहेत. तर नितिश राणानं 370 रन काढले आहेत. केकेआरला सर्वात मोठी चिंता कॅप्टन मॉर्गनच्या फॉर्मची आहे. त्यानं 15 मॅचमध्ये फक्त 129 रन काढले आहेत. तर दिनेश कार्तिकनं काही उपयुक्त खेळी खेळल्या आहेत. ऑलराऊंडर्स : एलिमिनेटर मॅचमध्ये सुनील नरीननं केकेआरला एकहाती विजय मिळवून दिला होता. आता दिल्लीविरुद्धही त्याच्यावर केकेआरची भिस्त असेल. शाकिब अल हसननं आंद्रे रसेलच्या अनुपस्थितीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण रसेलच्या फिटनेसबाबत सकारात्मक वृत्त आहे. त्यामुळे रसेल फिट झाला तर तो शाकिब अल हसनच्या जागी टीममध्ये नक्की खेळेल. बॉलर्स : मिस्ट्री स्पिनर्स वरुण चक्रवर्तीनं सलग दुसऱ्या वर्षी यूएईमध्ये चांगली कामगिरी केली आहे. गेल्या सिझनमध्ये 17 विकेट्स घेणाऱ्या चक्रवर्तीनं यंदा आत्तापर्यंत 16 विकेट्स घेतल्या आहेत. तो या सिझनमधील केकेआरचा सर्वात यशस्वी बॉलर आहे. लॉकी फर्ग्युसननं या आयपीएलमध्ये फक्त 6 मॅचमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला शिवम मावीनं मागील चार मॅचमध्ये चांगली साथ दिली आहे. IPL 2021: शेवटच्या टप्प्यात KKR अडचणीत, 'लकी' खेळाडू होणार Out! KKR ची संभाव्य Playing 11 : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन (कॅप्टन), शाकीब अल हसन/ आंद्रे रसेल,  सुनील नरीन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, KKR

    पुढील बातम्या