Home /News /sport /

IPL 2021, KKR vs DC: कोलकाताविरुद्धच्या मॅचपूर्वी दिल्लीच्या कोचनं टीमला दिला इशारा

IPL 2021, KKR vs DC: कोलकाताविरुद्धच्या मॅचपूर्वी दिल्लीच्या कोचनं टीमला दिला इशारा

यूएई लेगमध्ये केकेआरची (KKR) टीम फॉर्मात आहे. त्यांनी यापूर्वीच्या मॅचमध्ये दिल्लीचा पराभव केला होता. दिल्लीचा (DC)असिस्टंट कोच मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने या मॅचपूर्वी टीमला महत्त्वाचा इशारा दिला आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध पराभूत झालेल्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) फायनलमध्ये जाण्याची शेवटची संधी आहे. दिल्लीची  क्वालिफायर 2 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Delhi Capitals vs Kolkata Knight Riders) विरुद्ध होणार आहे. यूएई लेगमध्ये केकेआरची टीम फॉर्मात आहे. त्यांनी यापूर्वीच्या मॅचमध्ये दिल्लीचा पराभव केला होता. दिल्लीचा असिस्टंट कोच मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने या मॅचपूर्वी टीमला महत्त्वाचा इशारा दिला आहे. कैफनं मॅचपूर्वी सांगितलं की, 'सर्व काही दबाव झेलण्यावर आहे. प्रत्येक मॅचमध्ये दबाव वेगळा असतो, आव्हानं नवीन असतात. आम्हाला शांतपणे स्पष्ट विचारांसह उतरावं लागेल. सलग दोन मॅचमधील पराभवानंतर पुनरागमन करणं महत्त्वाचं आहे. केकेआर विरुद्धचा पराभव विसरुन आम्हाला उतरावं लागेल. आमच्याकडं मॅच जिंकणारे खेळाडू आहेत. अनुभवी आणि फॉर्मातील खेळाडूंची आमच्याकडं कमतरता नाही. कोलकातानं एलिमेनेटरमध्ये झालेल्या रंगतदार लढतीमध्ये आरसीबीचा पराभव केला होता. तर दिल्लीचा बंगळुरुनंतर चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्येही पराभव झाला आहे. त्यामुळे दिल्लीला डेथ ओव्हर्समध्ये परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यावर भर द्यावा लागेल. कोलकाताला पराभूत करुन सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल फायनलमध्ये धडक मारण्याची दिल्लीला संधी आहे. KKR vs DC, Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य या स्पर्धेतील सर्वात संतुलित टीममध्ये दिल्लीचा समावेश आहे. त्यांच्याकडं स्पर्धेतील  प्रभावी फास्ट बॉलर्स आहेत. त्यांना मदत करण्यासाठी अक्षर पटेल हा उपयुक्त स्पिनर आहे. त्याचबरोबर शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर ही मजबूत टॉप ऑर्डर दिल्लीकडं आहे. तर कॅप्टन ऋषभ पंत आणि शिमरन हेटमायर याांच्याकडं आक्रमक फटकेबाजी करत काही ओव्हर्समध्येच मॅचचं पारडं फिरवण्याची क्षमता आहे. दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य Playing 11 : शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कॅप्टन), शिमरन हेटमायर, अक्षर पटेल, टॉम करन, आर. अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि आवेश खान
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या