• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, DC vs CSK: मॅचनंतर धोनीनं सांगितलं विजयी इनिंगचं रहस्य, म्हणाला...

IPL 2021, DC vs CSK: मॅचनंतर धोनीनं सांगितलं विजयी इनिंगचं रहस्य, म्हणाला...

चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा (Chennai Super Kings vs Delhi Capitals) 4 विकेट्सनं पराभव करत आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) प्रवेश केला आहे

 • Share this:
  दुबई, 11 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा (Chennai Super Kings vs Delhi Capitals) 4 विकेट्सनं पराभव करत आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) प्रवेश केला आहे. चेन्नईच्या या विजयात कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीचा निर्णायक वाटा होता. धोनीनं शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये त्याच्या जुन्या काळातील खेळाची आठवण करुन देत सीएसकेला (CSK) नवव्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहचवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 13 रनची गरज होती आणि दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉम करनच्या हातात बॉल दिला. पहिल्याच बॉलला करनने मोईन अलीची विकेट घेतली. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलला धोनीने फोर मारली. दबावात आलेल्या करनने पुढचा बॉल वाईड टाकला, त्यानंतर धोनीने पुन्हा एकदा फोर मारत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीनं मॅचनंतर या विजयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'मी या स्पर्धेत फार चांगलं खेळलो नव्हतो. पण, मला बॉल पाहून खेळण्याची इच्छा होती. मी नेटमध्ये चांगली बॅटींग करत होतो. तसंच फार विचारही करत नव्हतो. कारण, बॅटींग करताना फार विचार केला तर तुमची रणनीती बिघडू शकते.' धोनीनं अन्य सहकाऱ्यांच्या खेळावरही यावेळी मत व्यक्त केलं. 'शार्दुल ठाकूरनं अलिकडच्या काळात चांगली बॅटींग केली आहे. त्यामुळे आम्ही त्याला वरच्या नंबरवर पाठवले. रॉबिन उथप्पा हा नेहमीच वरच्या क्रमांकावर चांगली बॅटींग करतो. मोईन अलीनंही तिसऱ्या क्रमांकावर चांगली बॅटींग केली आहे. ऋतुराजनंही त्याच्या खेळात खूप सुधारणा केली आहे, हे पाहून चांगले वाटते. संपूर्ण 20 ओव्हर्स बॅटींग करण्याचा त्याचा प्रयक्न असतो. मागच्या सिझनमध्ये आम्ही क्वालिफाय करु शकलो नव्हतो. पण, यंदा आम्ही जोरदार पुनरागमन केले आहे.'  दुबईत दिसले माहीचे मॅजिक, धोनीनं विजय मिळवून देताच फॅन्स इमोशनल! Photos दिल्लीला पराभूत करून चेन्नईची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. तर दिल्लीच्या टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी आहे. आरसीबी आणि कोलकाता यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल, ते दिल्लीविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळतील. या मॅचमध्ये जी टीम विजयी होईल ती फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळेल.
  Published by:News18 Desk
  First published: