मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, Qualifier1: सलग 3 पराभवानंतर धोनी करणार टीममध्ये बदल! अशी असेल CSK ची Playing11

IPL 2021, Qualifier1: सलग 3 पराभवानंतर धोनी करणार टीममध्ये बदल! अशी असेल CSK ची Playing11

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचं चौथं विजेतेपद पटकावण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) टीम मैदानात उतरणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचं चौथं विजेतेपद पटकावण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) टीम मैदानात उतरणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचं चौथं विजेतेपद पटकावण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) टीम मैदानात उतरणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 ऑक्टोबर:  इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचं चौथं विजेतेपद पटकावण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) टीम मैदानात उतरणार आहे. सीएसकेची लढत दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) होणार आहे. या सिझनमध्ये यापूर्वी झालेल्या दोन्ही मॅचमध्ये दिल्लीनं चेन्नईचा पराभव केला आहे. पण रविवारी विजय मिळवला तर सीएसकेला थेट फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

सीएसकेनं (CSK) यूएईमधील लेगची सुरूवात धडाक्यात केली. आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करणारी ती पहिली टीम होती. मात्र त्यानंतर सलग तीन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सचं (DC) आव्हान परतवून लावण्यासाठी महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) नव्या योजनेसह मैदानात उतरावं लागणार आहे. या मॅचमध्ये सीएसके कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरेल ते पाहूया

ओपनर्स : सीएसकेच्या ओपनिंग जोडीत कोणताही बदल होणार नाही. फाफ ड्यू प्लेसी आणि ऋतुराज गायकवाडनं या स्पर्धेत चांगला खेळ केला आहे. ही जोडीच दिल्लीविरुद्ध इनिंगची सुरूवात करेल. ड्यू प्लेसीनं या स्पर्धेत आजवर 546 तर ऋतुराजनं 533 रन काढले आहेत. सर्वाधिक रन करण्याच्या यादीत हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मिडल ऑर्डर : मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला येईल. त्यानंतर अनुभवी सुरेश रैना फिट असेल तर त्याचा टीममध्ये समावेश होईल. मागील दोन मॅचमध्ये रैना खेळू शकला नव्हता. रैना फिट नसल्यास रॉबिन उथप्पा त्याच्या जागी खेळेल. त्यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांचा क्रमांक आहे.

DC vs CSK, Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

ऑल राऊंडर्स : रविंद्र जडेजा हा सीएसकेचा महत्त्वाचा ऑल राऊंडर आहे. अनुभवी ब्राव्होनंही यूएईमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या मॅचमध्येही सीएसकेला त्यांच्याकडून अपेक्षा असेल.

बॉलर : दीपक चहर फास्ट बॉलर्सचं नेतृत्त्व करेल. तर शार्दुल ठाकूर आणि जोश हेजलवूडचा टीममध्ये समावेश नक्की आहे. चेन्नईच्या टीममध्ये स्पेशालिस्ट स्पिनर नाही. त्याची कमतरता भरुन काढण्यासाठी धोनी ऑल राऊंडर्सचा वापर करणार आहे.

IPL मध्ये सर्वात फास्ट बॉल टाकण्याचं मिळालं गिफ्ट, ‘या’ बॉलरचा टीम इंडियात समावेश

CSK ची संभाव्य 11 :  फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना/रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू,  महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेजलवुड

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni