Home /News /sport /

IPL 2021: टीम इंडियाला मिळाला खतरनाक बॉलर, बुमराह-शमीवरही ठरतोय भारी!

IPL 2021: टीम इंडियाला मिळाला खतरनाक बॉलर, बुमराह-शमीवरही ठरतोय भारी!

या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) भारताला आणखी एक खतरनाक बॉलर मिळाला आहे. डेथ ओव्हर्समध्ये रन वाचवण्याबरोबरच विकेट घेण्याचं त्याचं कौशल्य पाहता तो लवकरच टीम इंडियाकडून (Team India) खेळताना दिसू शकतो.

    मुंबई, 26 सप्टेंबर :इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही स्पर्धा जगातील सर्वात बलाढ्य टी20 लीग आहे. भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू या स्पर्धेतून मिळाले आहेत. टीम इंडियाचा आघाडीचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. बुमराहची पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) मार्फत क्रिकेट विश्वात एन्ट्री झाली. आयपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर तो आज जगातील सर्वात धोकादायक बॉलर बनला आहे. या आयपीएल स्पर्धेत भारताला आणखी एक खतरनाक बॉलर  मिळाला आहे. या बॉलरचं नाव आहे अर्शदीप सिंग (Arshdeep Singh). पंजाब किंग्ज (Punjab Kings) कडून खेळणाऱ्या अर्शदीपनं यूएईमध्ये सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत घातक बॉलिंग केली आहे. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये रन वाचवण्याबरोबरच विकेट घेण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे तो लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो. IPL 2021: मनिष पांडेनं मैदानात केलं बालिश वर्तन, सगळीकडे होतेय थू-थू अर्शदीपनं राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्या मॅचमध्ये पंजाबचा 2 रननं निसटता पराभव झाला. पण डेथ ओव्हर्समध्ये राजस्थानच्या इनिंगला ब्रेक लावण्याचं काम अर्शदीपनं केलं होतं. रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्येही अर्शदीपनं डेथ ओव्हरमध्ये प्रभावी बॉलिंग केली. त्यानं 17 आणि 19 व्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन देत राशिद खानची विकेट घेतली. पंजाबच्या हैदराबादवरील विजयात अर्शदीपच्या घातक बॉलिंगचा महत्त्वाचा वाटा होता. PURPLE CAP: पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये अर्शदीप अर्शदीप सिंग यंदा सर्वाधिक विकेट्स घेतल्यानंतर मिळणाऱ्या पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये आहे. त्यानं 8 मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या असून तो या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. पंजाबचा प्रमुख फास्ट बॉलर मोहम्मद शमीला त्यानं भक्कम साथ दिली आहे. शमीनं देखील या आयपीएलमध्ये 13 विकेट्स घेतल्या असल्या तरी त्यानं अर्शदीपपेक्षा दोन मॅच जास्त खेळल्या आहेत. तर अर्शदीपनं जसप्रीत बुमराहपेक्षा 2 विकेट्स जास्त घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Punjab kings

    पुढील बातम्या