IPL 2021: चौथ्या प्रयत्नात वॉर्नर यशस्वी! पंजाबचा सलग तिसरा पराभव

IPL 2021: चौथ्या प्रयत्नात वॉर्नर यशस्वी! पंजाबचा सलग तिसरा पराभव

चेन्नईच्या मैदनातील पराभवाची साखळी तोडण्यात अखेर डेव्हिड वॉर्नरला यश आलं आहे. हैदराबादचा (SRH) या सिझनमधील पहिलाच विजय असून पंजाब किंग्ज (PBKS) सलग तिसरा पराभव आहे.

  • Share this:

चेन्नई, 21 एप्रिल: चेन्नईच्या मैदनातील पराभवाची साखळी तोडण्यात अखेर डेव्हिड वॉर्नरला (David Warner) यश आलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं (SRH) सहा पराभवानंतर सातव्या मॅचमध्ये चेन्नईत विजय मिळवलाय. हैदराबादनं पंजाबचा 9 विकेट्सनं पराभव केला. पंजाबनं दिलेलं 121 रनचं आव्हान हैदराबादनं आरामात पार केलं. हैदराबादचा या सिझनमधील पहिलाच विजय असून पंजाब किंग्जचा (PBKS) सलग तिसरा पराभव आहे.

हैदराबादचा खराब बॅटिंगमुळे मागील तीन सामन्यात पराभव झाला होता. पंजाब किंग्ज विरुद्ध त्यांनी ती चूक केली नाही. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 73 रनची भक्कम पार्टरनरशिप केली. वॉर्नर 37 रनवर आऊट झाला. त्यानंतर बेअरस्टोला या आयपीएल सिझनमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या अनुभवी केन विल्यमसननं (Kane Williamson) भक्कम साथ दिली. या दोघांनी चांगल्या ओपनिंग पार्टरनरशिपचा बेरंग होणार नाही, याची काळजी घेतली. बेअरस्टोनं 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं. त्यानं नाबाद 63 रन काढले.

यापूर्वी  पंजाबचा कॅप्टन के.एल. राहुल (KL Rahul) याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या बॅट्समन्सना या निर्णयाचा फायदा घेता आला नाही.पंजाबची सुरुवात खराब झाली. कॅप्टन केएल राहुल फक्त 4 रन काढून आऊट झाला. त्याला भुवनेश्वर कुमारनं आऊट केलं. पंजाब या धक्क्यातून सावरण्यापूर्वी मयंक अग्रवाल (22) रनवर आऊट झाला. निकोलस पूरन पुन्हा एकदा शून्यावर आऊट झाला.

चार कोटींचा बॅट्सन ठरतोय राहुलची मोठी डोकेदुखी, 4 पैकी 3 वेळा शून्यावर आऊट!

अनुभवी ख्रिस गेल आणि मोईसेस हेन्रिक्स यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. पंजाबची टीम 19.4 ओव्हर्समध्ये 120 रनवर ऑल आऊट झाली. मयंक अग्रवालनं सर्वात जास्त 22 रन काढले. हाैदराबादकडून खलिल अहमदनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. अभिषेक शर्मानं 2 तर राशिद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.

Published by: News18 Desk
First published: April 21, 2021, 6:59 PM IST

ताज्या बातम्या